नाशिक येथे भव्य स्वराज्य संकल्प मेळाव्याचे आयोजन पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे करणार मार्गदर्शन
नाशिक प्रतिनिधी:-छत्रपती संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने विधानसभा निवडणूक लढवण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे.त्या पार्श्वभूमीवर तशी पक्षाने तयारी देखील सुरु केली आहे.
अशातच आता त्यांच्या संघटनेला निवडणूक आयोगाने ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून मान्यता दिली आहे.याबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला “सप्तकिरणांसह पेनाची निब’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
नाशिक येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ ऑक्टोबर २०२४ रोजी भव्य ‘स्वराज्य संकल्प मेळाव्याचे’ आयोजन केले आहे.हा मेळावा रावसाहेब थोरात सभागृह,गंगापूर रोड के.टी.एच.एम.कॉलेज नाशिक येथे संपन्न होणार असून आहे.या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे मार्गदर्शन करणार आहेत.तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या नाशिक महिला जिल्हाध्यक्षा सौ.रेखाताई जाधव यांनी केले आहे.