Maharashtra247

भाजपा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा कार्यकारणी सदस्या माढा तालुका पूर्व मंडल महिला मोर्चा अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या माया माने यांची नियुक्ती 

 

माढा प्रतिनिधी:-माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील भाजपा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा कार्यकारणी सदस्या तसेच मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सोलापूर जिल्हा सहसंयोजिका सामाजिक कार्यकर्त्या सौ.माया माने यांची माढा तालुका पूर्व मंडल भाजपा महिला मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

माढा तालुक्यात महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून व तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या सौ.माया माने यांची महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड झाल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने आणि ताकदीनिशी काम करून पक्षाला यश मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस,भाजप प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखर बावनकुळे,पालकमंत्री चंद्रकांत पाटील,पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे,माजी खासदार श्री.रणजीतसिंह नाईक निंबाळकर,जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार-सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष श्री.योगेश पाटील यांनी सौ.माया माने यांना माढा पूर्व मंडलच्या महिला मोर्चा अध्यक्षपदीचे नियुक्तीपत्र देऊन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी नवनियुक्त सरचिटणीस दत्तात्रय जाधव,राहुल केदार, इतर भाजप पदाधिकारी,मेजर अर्जुन माने व महिला भगिनी उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page