जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न
अहिल्यानगर (दि.१४) -जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव हेमा बडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
बैठकीस अशासकीय सदस्य अतुल कुराडे,विलास जगदाळे,शाहूराव औटी,अमित कोहली,दिनेश थोरात, अशोक शेवाळे,रणजित श्रीगोड, उमा म्हेत्रे,बाबासाहेब भालेराव, डॉ.राजेंद्र कळमकर,विलास सोनवणे,सुनिल दळवी,डॉ.गोरख बारहाते व प्रकाश रासकर आदी उपस्थित होते.
ऊर्जा मित्र बैठक पूर्ववत सुरू करणे, अवैध गुटखा विक्री, स्वयंपाक गॅस वितरणातील गैरप्रकार, सेतू कार्यालयातील अवैध सेवाशुल्क, भेसळयुक्त मिठाईची विक्री, एसटी थांबा आदी विषयावर या बैठकीत चर्चा झाली.
ग्राहक संरक्षण परिषदेच्या प्रत्येक तालुक्यानिहाय नियुक्त सदस्यांची यादी तहसील कार्यालयाच्या प्रसिद्ध फलकावर लावण्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती बडे यांनी यावेळी दिली.