Maharashtra247

गांजाची वाहतुक करणारे तीघे आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

अहिल्यानगर (दि.२८ प्रतिनिधी):-दोनशे किलो गांजाची वाहतुक करणारे तीन आरोपींना 63 लाख 22,800/-रू किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात अवैध धंदयावर कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.

नमुद आदेशान्वये स्थागुशा पथक जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती घेताना दि.27 ऑक्टोबर 2024 रोजी पोनि/श्री. आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तीन इसम त्यांचे कडील टाटा कंपनीचा पांढरे रंगाचा टेम्पो क्रमांक एमएच-02-ईआर-4045 मधुन अंमली पदार्थ गांजा भरून खर्डा, ता.जामखेड येथून अहिल्यानगरचे दिशेने विक्रीकरीता येत असलेबाबत माहिती मिळाली.पोनि/श्री.आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार संतोष लोढे, अतुल लोटके,फुरकान शेख, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे,प्रशांत राठोड,अरूण मोरे, विजय ठोंबरे, रोहित मिसाळ,मेघराज कोल्हे नेम.तपास पथक अहील्यानावर अशांचे पथक तयार केले.तसेच भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मदतीस घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले.नमूद पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कॅम्प पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना सदर बातमी कळवून पंच व आवश्यक साधने सोबत घेऊन कारवाई सोबत येणेबाबत कळविले. 

पथकाने जामखेड ते अहिल्यानगर रोडवरील एमआयआरसी,हत्ती बारव येथे सापळा लावून टेम्पोचा शोध घेत असताना पांढरे रंगाचा टेम्पो क्रमांक एमएच-02-ईआर-4045 क्रमांकाचे वाहन अहिल्यानगरच्या दिशेने येताना दिसला.टेम्पो रस्त्याचे कडेला थांबवून, टेम्पोची पाहणी करता त्यामध्ये 3 इसम बसलेले दिसले. संशयीतास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव संतोष वसंत पठाडे, वय 35, रा.सम्राटनगर, वडगावगुप्ता, एमआयडीसी, अहिल्यानगर,अक्षय सुर्यकांत भांड, रा.कोल्हार,ता.राहुरी, जि.अहिल्यानगर,सतीष अंकुश काळे,वय 32, रा.सालसे, ता.करमाळा, जि.सोलापूर असे असल्याचे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांची व टेम्पोची पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून झडती घेतली असता संतोष वसंत पठाडे याचेकडून 30,000/- रुपये किंमतीचे दोन मोबाईल व टेम्पोमधुन 47,92,800/- रू किंमतीचा 199.700 कि.ग्रॅ.वजनाचे अंमली पदार्थ गांजा, व 15,00,000/- रू किंमतीचा टेम्पो असा एकुण 63,22,800/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.ताब्यातील आरोपीकडे जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा जप्त केलेला गांजा हा समीर इनामदार पुर्ण नाव माहित नाही रा.अहिल्यानगर ( फरार ) याचे सोबत ओरीसा राज्यातून आणला असले बाबतची माहिती सांगीतली.वर नमूद आरोपी हे जप्त करण्यात आलेला मुद्देमाल विनापरवाना बेकायदा विक्री करण्याचे उद्देशाने बाळगताना मिळून आल्याने त्यांचे विरूध्द पोकॉ/1699 शिवाजी अशोक ढाकणे, नेम.स्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगर यांनी दिलेल्या भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गु.र.नं. 754/2024 एनडीपीएस ॲक्ट कलम 8 (क), 20 (ब) (ii) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page