प्रभाग क्रमांक ५ मध्ये नगर विकास यात्रेच्या माध्यमातून प्रचार फेरी;फटाक्यांची आतिषबाजी व जेसीबीच्या साह्याने फुलांचा वर्षाव करून आ.संग्राम जगताप यांचे स्वागत
अहिल्यानगर प्रतिनिधी:-विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित झाल्यापासून आ.संग्राम जगताप यांनी नगर शहर अक्षरशा पिंजून काढले आहे.
नगर विकास यात्रेच्या माध्यमातून प्रचार सुरु केला आहे. प्रभाग क्रमांक ५ येथील भिस्तबाग चौक,श्रमिक नगर-बालाजी मंदिर-जयेश मार्केट-शिवकृपा कॉलनी-वैदुवाडी वैदुवाडी मारुती मंदिर-कुष्ठधाम रोड सोनानगर चौक या ठिकाणी प्रचाराच्या माध्यमातून नागरिकांनी आमदार संग्राम भैय्या जगताप यांचे स्वागत केले व ठीक ठिकाणी जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी केली.यावेळी आ.जगताप म्हणाले की माझ्या कामाची पावती ही जनता पाहूनच विरोधकांना समजेल.
मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करत असल्याचे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी केले.यावेळी प्रभागातील नगरसेवक मनोज दुलम,सामाजिक कार्यकर्ते उदय कराळे,भैय्या गंधे,शिवाजी चव्हाण,योगेश ठुबे,सतीश शिंदे,तुषार यादव,शेखर तुंगार, गणेश वाणी,जालिंदर शिंदे,सुरज शिंदे,किरण बारस्कर,सागर येमुल, सतीश बारस्कर,काशिनाथ शिंदे यांच्यासह प्रभागातील महिला व पुरुष उपस्थित होते.