रामचंद्र खुंट येथील श्री स्वयंभू शनी मंदिरात १००१ दिव्यांनी दीपोत्सव साजरा
अहिल्यानगर प्रतिनिधी:-दिवाळीमध्ये दीपोत्सवला खूप महत्त्व आहे.भगवान श्री रामाने अहंकारी रुपी रावणाचा वध केला.व आयोध्याला परतले.वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींनी विजय मिळवला.या दिवसापासून दीपावली साजरी केली जाते.जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी दीपोत्सव सर्वत्र साजरा केला जातो.
रामचंद्र खुंट परिसरातिल शनि गल्ली येथिल पुरातन श्री स्वयंभू शनि मारुती मंदिरात सालाबाद प्रमाणे दीपोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.मंदिरात आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती.तसेच मंदिरात 1001 दिव्यांनी दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
यावेळी शनी मंदिराचे पुजारी ओम पांडे,बापू ठाणगे,संजय जोशी,महेंद्र चंदे,महेश बेद्रे,बाली जोशी,जयसिंग थोरात,भारत थोरात आदि उपस्थित होते.