महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या नगर विकास यात्रेला प्रभाग १३ मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद;आ.संग्राम जगताप यांच्या माध्यमातून नगर शहराचा विकास झाला नगरसेवक गणेश कवडे
अहिल्यानगर प्रतिनिधी:-महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या नगर विकास यात्रा व प्रचाराचा झंजावात नगर शहरात सुरू आहे. त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.त्यातच प्रभाग क्रमांक १३ मधील ठाकरे गटाचे नगरसेवक गणेश कवडे यांनी आ.जगताप यांनी नगर शहरात जवळ पास विकास कामांसाठी ४०० ते ५०० कोटी रुपयांचा निधी आणून शहर विकासाला गती दिली या विकास कामाने प्रेरित होऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
आ.संग्राम जगताप यांची नगर विकास यात्रा शहरातील दिल्लीगेट येथील शमी गणपती मंदिरा पासून सुरू झाली रंगारगल्ली येथे या यात्रेचा समारोप झाला.यावेळी नालेगाव येथील महिलांनी ठिकठिकाणी ‘विजयी भव’ अशा सुंदर रांगोळीचे रेखाटन केलेले होते.
संपूर्ण नालेगाव परिसर हा फुलांनी सजवून निघालेला होता.यावेळी संग्राम जगताप म्हणाले की मी प्रभागात प्रचार करत फिरत असताना माझे सर्वांनी आपुलकीने स्वागत केले त्यामुळे मला जाणवले की आपण सर्व एकाच कुटुंबाचे सदस्य आहोत.या माजी नगरसेवक किशोर डागवले,मा.उपमहापौर गणेश भोसले,माजी नगरसेवक गणेश कवडे,माजी नगरसेवक संभाजी लोंढे,वैभव वाघ,अमोल भंडारे,राम वाघ,आदींसह परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.