तोफखाना हद्दीतील तीन कॅफे शॉपवर छापे कॅफे चालकांवर गुन्हे दाखल
अहिल्यानगर (दि.१० प्रतिनिधी):-गाळ्यामध्ये प्लायवुडचे कंम्पार्टमेंटमध्ये शाळा,कॉलेज मधील मुला मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफे शॉपवर तोफखाना पोलीसांनी कारवाई करत तीन कॅफे शॉप चालकांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे.
दि.10 नोव्हेंबर 2024 रोजी तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पंपिंग स्टेशन रोड,ताठे नगर,येथे गोल्ड स्टार कॅफे,व्दारकाधीश कॉप्लेक्स,श्रीराम चौक,पाईपलाईन रोड, सावेडी येथील कॅफे, (पारिजात चौक, गुलमोहर रोड येथील कॅफे,अशा विवीध कॅफेमध्ये कॉफी शॉप बोर्ड लावुन कुठलाही कॉफी हा पेय तसेच इतर कुठलेही खाद्य पदार्थ विक्रीसाठी न ठेवता आतमध्ये लाकडी कंपार्टमेंट बनवुन त्यास बाहेरुन पडदे लावुन आतमध्ये बसण्यासाठी सोफे ठेवुन मुला-मुलींना बसण्यासाठी व अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देत असल्याची बातमी तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाल्याने सदर बातमीची दखल घेवुन तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तात्काळ कारवाई करुन सदर ठिकाणी कॅफेमध्ये प्लाऊड,बोर्ड, पार्टीकलने वेगवेगळे कंपार्टमेंट केलेले दिसले.
त्यात काही मुले व मुली या अश्लिल चाळे करताना दिसले.तसेच सदर कॅफेची पाहणी केली असता 3 बाय 3 लांबी रुंदीचे प्लाऊडचे व सुमारे 5 फुट उंचीचे विवीध कंप्पे व त्यास बाहेरच्या बाजुने पडदे बसविलेले अढळुन आले.आतमध्ये बसण्यासाठी छोटे सोपे ठेवलेले दिसुन आले. कॉफी शॉपमध्ये दर्शनी भागात कॉफीशॉपचा परवाना दिसुन आला नाही किंवा कॉफी बनविण्यासाठी लागणारे साहित्य कॉफी पावडर, साखर,गॅस किंवा इतर साधणे दिसुन आले नाही.सदर ठिकाणी अनाधिकृत असल्याने सदर ठिकाणी अश्लील चाळे करण्यासाठी अडोशासाठी बनविलेले पडदे तात्काळ काढुन टाकण्यात आले व तेथे मिळुन आलेल्या मुला-मुलींना तोंडी समज देवुन सोडण्यात आले.सदर कॅफे चालकांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 129, 131 (क) (क) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक.श्री राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली तोफखाना पो.नि श्री.आनंद कोकरे यांच्या पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.
नागरीकांना नम्र आवाहन
तोफखाना पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे यांच्याकडून सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,कॉलेज,क्लासेसला जाणाऱ्या मुलीच्या नातेवाईकांनी आपल्या पाल्याच्या वर्तनुकीवर बारकाईने व जबादारीने लक्ष ठेवावे.आपल्या पाल्याचे मित्र कोण आहेत,ते बाहेर काही टवाळखोरी करतात काय ? या बाबत बारकाईने लक्ष ठेवावे. यापुढे असे टवाळखोर व सार्वजनिक ठिकणी बेशिस्त वर्तनुक करणारी इसमे अढळुन आल्यास तोफखाना पोलीस स्टेशनकडुन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची खबरदारी घ्यावी…