सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशनचा महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांना जाहीर पाठिंबा
अहिल्यानगर प्रतिनिधी:-सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशनची रविवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत विधानसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांना जाहीर पाठिंबा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
माजी आमदार अरुण जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस ज्येष्ठ व्यापारी अर्जुन कसबे,सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण,उपाध्यक्ष संतोष भोजने व देवता पाऊलबुद्धे,सचिव प्रमोद डोळसे,सहसचिव श्रीपाल कटारिया, खजिनदार केतन बाफना,सह खजिनदार यश शहा,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर,माजी नगरसेवक बाळासाहेब पवार,निखिल वारे, विनीत पाऊलबुद्धे आदींसह सर्व सदस्य व व्यापारी उपस्थित होते.
यावेळी अरुण जगताप म्हणाले, सावेडी उपनगराची झपाट्याने वाढ होत आहे.या परिसरामध्ये अनेक चांगल्या सुविधा आमदार संग्राम जगताप यांनी उपलब्ध करून दिले आहेत.त्यामुळे लोकवस्ती तसेच व्यवसाय वाढत आहेत.नवनवीन ब्रँडेड कंपन्यांचे अत्याधुनिक दालने सावेडी उपनगर मध्ये सुरू होत आहेत,हे शहराच्या प्रगतीचे लक्षण आहे.सावेडी उपनगर व्यापारी असोसिएशनचे उत्कृष्ट काम चालू आहे.चांगले काम करणाऱ्या या संघटनेने उमेदवार आ.जगताप यांना पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभारी आहोत.यापूर्वी व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न आमदार जगताप यांनी सोडवले आहेत.भविष्यातही जे काही प्रश्न समस्या असतील त्याही प्राधान्याने सोडवू.
संपत बारस्कर म्हणाले,नगर शहरातील जनतेसाठी आ.संग्राम जगताप हे २४ उपलब्ध असून सर्व नागरिकांसाठी उभे असतात. नगरचा विकास हाच त्यांचा अजेंडा आहे.त्यांना नागरिकांच्या प्रश्नांची जाण असल्याने सर्व समस्या व प्रलंबित प्रश्न सोडवण्यास त्यांनी प्राधान्य दिले आहे.नगरच्या इतिहासात आजपर्यंत सर्वात जास्त विकास निधी आणून त्यांनी नवा इतिहास घडवला आहे.आ.जगताप यांनी शहरात नुसतेच विकास कामे केली नाहीत तर शहरातील तरुणांचे भवितव्य त्यांनी घडवले आहे. नगरच्या उज्वल भवित्यासाठी त्यांनी तिसऱ्यांदा आमदार होणे आवश्यक आहे.
बाळासाहेब पवार म्हणाले,सावेडी उपनगर मधील सर्व रस्ते आमदार जगताप यांनी काँक्रिटीकरण केले आहे.त्यामुळे चांगल्या दळणवळण वाढले आहे.ज्या भागात चांगले दळणवळण होते तेथेच व्यापार चांगला होत वाढत असतो.त्यामुळे याभागात व्यापाऱ्यांना चांगल्या सुविधा मिळत असल्यानेच सावेडी मधील उद्योग व्यवसाय भरभराटीस आले आहेत.सावेडी उपनगर असोसिएशनने आमदार जगताप यांना स्वतःहून पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.
यावेळी निखिल वारे यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविकात व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी आमदार जगताप यांनी व्यापारी वर्गास केलेल्या सहकार्याची व सोडवलेल्या प्रश्नांची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा बागडे यांनी केले तर संघटनेचे सचिव प्रमोद डोळसे यांनी आभार मानले यावेळी कार्यकारणी सदस्य यश गांधी,मंगेश नीसळ,शिवाजी मुंगसे,सचिन बाफना,विपुल छाजेड,प्रसाद कुलकर्णी,लक्ष्मीकांत चिकटे,रोहित पवार,विकास वामन,विनय पित्रोडा, रावसाहेब चव्हाण,मीना चव्हाण,उद्धव चिंधे,संगीता डोळसे,रेणुका कुलकर्णी,सौ.भोजने आदींसह व्यापारी उपस्थित होते.