Maharashtra247

महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करत बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार कु.मेघा तायडे यांच्या प्रचारास सुरुवात

 

अमरावती प्रतिनिधी:-अमरावती शहर विधानसभा मतदारसंघाच्या बहुजन समाज पार्टीच्या तरुण तडफदार उच्चशिक्षित सामाजिक कार्यकर्त्या उमेदवार कु.मेघा तायडे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांनी शहरात विविध ठिकाणी प्रचार सुरू केला आहे.

आज शेगाव,केवळ कॉलनी,अंगद नगर,होले एरिया या ठिकाणी प्रचार सुरू असताना स्थानिक नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले.त्यांचे ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले.यावेळी उमेदवार मेघा तायडे म्हणाल्या की,मी एक उच्चशिक्षित असून विधानसभेमध्ये निवडून गेल्यानंतर नागरिकांच्या समस्या मांडणार व जे युवक व युवती बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी शहरांमध्ये मोठमोठे उद्योग आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हटल्या.यावेळी उमेदवार कु.तायडे मिळाल्या की रहाटगाव मध्ये प्रचारादरम्यान फिरत असताना या एरियामध्ये व्यवस्थितरित्या साफसफाई झालेली नव्हती त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते,तसेच वयोवृद्ध पेन्शनरांचे अजूनही पेन्शन झालेली नाही हे काम एक सामाजिक बांधिलकी म्हणून लोकप्रतिनिधीचे आहे परंतु लोकप्रतिनिधी हे काम करताना दिसून येत नाहीये,त्यामुळे मी प्रामाणिकपणाने लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे मतदारांनी हत्ती चिन्हा समोरील बटन दाबून मला निवडून द्यावे व समाजसेवा करण्याची संधी द्यावी.

You cannot copy content of this page