गावठी कट्टयासह दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या मुसक्या
अहील्यानगर (दि.९ प्रतिनिधी):-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावठी कट्टयासह आरोपीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.बातमीची हकीगत अशी की,जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आगामी विधानसभा निवडणुक 2024 ही भयमुक्त वातावरणात पार पाडण्याचे दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री दिनेश आहेर यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
नमुद आदेशाप्रमाणे पोनि.श्री. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार मनोहर गोसावी,गणेश भिंगारदे, पोहेकॉ/फुरकान शेख,रोहित येमुल,सागर ससाणे,रणजित जाधव, प्रशांत राठोड,रमीजराजा आतार यांचे पथक तयार करुन जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणे बाबत पथकास मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.वरील पोलीस पथक लोणी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अग्निशस्त्र,हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत दोन इसम विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी कट्टा (अग्निशस्त्र) त्याचे कब्जात बाळगुन ते विक्री करण्याचे उद्देशाने कोल्हार ते बेलापुर जाणारे रोडवरील ओमसाई सर्व्हीस स्टेशनजवळ,गळनिंब शिवार,ता.श्रीरामपुर या ठिकाणी येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली.
पथकाने तात्काळ बातमीतील ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले असता ओमसाई सर्व्हीस स्टेशनजवळ दोन संशयीत इसम येवुन थांबले.त्यावेळी पथकाची बातमीतील हकीगतीप्रमाणे खात्री झाल्याने सदर दोन्ही इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे ऋषीकेश कैलास जाधव वय 21 वर्षे,रा. सुतगिरणी,दत्तनगर रोड, श्रीरामपुर,ता. श्रीरामपुर, जि.अहिल्यानगर,परवेज जमीर शेख वय 22 वर्षे, रा.आय.डी.बी.आय.बॅक समोर,नेवासा रोड,वार्ड नं.6,श्रीरामपुर,ता. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांची अंगझडती घेता त्यांचे कब्जामध्ये 30,000/- रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) व 1000/- रुपये किमतीचे 01 जिवंत काडतुस असा एकुण 31,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाविरुध्द पोकॉ/203 रमीजराजा रफिक आत्तार यांचे फिर्यादीवरुन लोणी पोलीस ठाणे गु.र.नं. 617/2024 आर्म ऍ़क्ट कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास लोणी पोलीस ठाणे करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधिक्षक,श्रीरामपुर व श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार व तपास पथकातील अंमलदार यांनी केली आहे.