विकासकामांमुळे नागरिकांमध्ये मोठा विश्वास निर्माण झाल्याने नागरिकांनीच निवडणूक हातात घेतली आ.संग्राम जगताप;शहरात मोठे शक्तिप्रदर्शन करून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ
नगर प्रतिनिधी:-विधानसभा निवडणुकीसाठी शहरात प्रचार करताना सर्वच भागांमध्ये मला नगरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.ठिकठिकाणी होणाऱ्या उत्स्फूर्त स्वागताने मी भारावून जात आहे.या विकास कामांमुळे नागरिकांमध्ये नवा विश्वास निर्माण झाला असून त्यांनीच निवडणूक हातात घेतली आहे.हि निवडणूक विकासाच्या मुद्य्यांवर लढवत असून गेल्या १० वर्षात केलेले विकासकामे नागरिकांपर्यंत घेऊन जात आहे. नागरिकांना अपेक्षित असलेले विकास कामे होत असल्याने नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.शहाराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत.भविष्यात या विकासकांमुळे शहराची वेगळी ओळख निर्माण होणार आहे.हा शहर विकासाचा वेग अजून वाढवण्यासाठी नगरकरांनी मला पुन्हा मतांचा आशीर्वाद द्यावा. मतांचे हे ऋण शहराच्या सर्वांगीण विकासाने मी फेडणार आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगतो यांनी केले.
महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी सकाळी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात विधिवत पूजा करून करण्यात आला.माजी आमदार अरुण जगताप,भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, आरपीआयचे शहराध्यक्ष किरण दाभाडे, भाजपाचे शहर विधानसभा प्रमुख महेंद्र गंधे आदींसह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आदी महापुरुषांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांनी अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोठे शक्ती प्रदर्शन करत प्रचार फेरी काढण्यात आली . यावेळी ठिकठिकाणी मोठे पुष्पहार व जेसीबीतून पुष्पृष्टी करून व फटाक्यांची आतषबाजी करून’ प्रचार फेरीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नागरिकांना अभिवादन करत संग्राम जगताप प्रचार फेरीत चालत होते. यावेळी माळीवाडा परिसरात यावेळी मोठी गर्दी झाली होती.
अभय आगरकर म्हणाले, या विधानसभा निडणुकीत राज्यातील तीन प्रमुख राजकीय पक्ष एकत्र येत महायुती झाली आहे.राज्याच्या विकास केवळ महायुतीचे सरकारच करू शकत असल्याने राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार आहे. नगरमध्येही महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांचा विजय निश्चित आहे.
अनिल शिंदे म्हणाले, आ.संग्राम जगताप यांनी शहराच्या विकासात मोलाची भर घातली आहे . त्यामुळे रस्त्ये, पाणी, आरोग्य, लाईट आदी मूलभूत समस्या सुटल्या आहेत. या विकासकांमुळे शहरातील जनता आ.जगतापांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.
संपत बारस्कर म्हणाले, शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या शक्त प्रदर्शनाने झाला आहे.आमदार संग्राम जगताप यांच्या झंजावातामुळे त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे मोठे सहकार्य निवडणुकीत होत आहे.
यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव, किशोर डागवले, अविनाश घुले, गणेश भोसले, अशा निंबाळकर , संजय सपकाळ, पोपट पाथरे, काका शेळके, माणिक विधाते , प्रशांत मुथा , सचिन पारखे, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, मनोज कोतकर, बाबासाहेब वाकळे ,गीता गिल्डा, मालन ढोणे, रेश्मा आठरे, अंजली आढाव, लतिका पवार, दत्ता मुदगल, दीपक सूळ, सुनील काळे आदींसह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते