विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट विविध ठिकाणी छापे
अहिल्यानगर प्रतिनिधी:-विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दि.13 नोव्हेंबर 2024 रोजी हातभट्टी गावठी दारू व देशी दारू वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक क्र. 1 विभागाची धडक कारवाई करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत एकुण 2 गुन्हे नोंद केले असून सदर गुन्ह्यात गावठी दारू 40 लिटर व देशी दारू 8.64 ब.ली सह 2 दुचाकी असा एकुण अंदाजे 210760/-किमंतीचा मुद्देमाल जागीच जप्त केला आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.या कारवाईत श्री.प्रमोद सोनोने अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,अहिल्यानगर व श्री.प्रविण कुमार तेली, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.1 श्री.एस.आर.कुसळे, दु.नि श्री आ.जावळे,श्री.व्ही.एन. रानमाळकर,सहा.दु.नि.जवान सर्व श्री.सुरज पवार,चतुर पाटोळे, सुनंदा अकोलकर महिला जवान हे सहभागी झाले होते.
तरी जनतेस आव्हान करण्यात येते की,अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री संदर्भात कोणतेही माहिती अथवा तक्रार असल्यास 1800 2339 999 व व्हाटस ॲप क्र.8422001133 या क्रमांकावर संपर्क साधावा.