Maharashtra247

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

 

अहिल्यानगर प्रतिनिधी:-विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग,अहिल्यानगर यांची धडाकेबाज कारवाई करत हातभट्टी गावठी दारु,देशी-विदेशी दारुची वाहतुक व विक्री करणारे एक चारचाकी,एक तीनचाकी आणि सहा दुचाकी वाहने मुद्देमालासह जप्त केली आहे.

भारतीय निवडणुक आयोगाच्या वतीने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक कार्यक्रम निश्चित करण्यात आला असुन आदर्श आचार संहितेच्या अनुषंगाने दि.१५ ऑक्टोबर २०२४ ते १५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्य उत्पादन शुल्क,अ-विभाग,अहिल्यानगर यांनी विशेष मोहीम राबवुन अहिल्यानगर शहर,नेप्ती,खडकी आणि खंडाळा परिसरामध्ये हातभट्टी गावठी दारुची निर्मिती,विक्री आणि वाहतुकीवर एकुण ३९ गुन्हे नोंद करण्यात आले असुन त्यामध्ये ६ दुचाकी वाहने,१ तीनचाकी वाहन आणि १ चारचाकी वाहनासह ८७५० लिटर रसायन,१४४६ लिटर हातभट्टी गावठी दारू, ४० लिटर ताडी,४०.५० ब.लि.देशी दारु,६४.९८ विदेशी दारु,५.८५ ब.लि. बिअर व वाहन असा एकुण १२ लाख ५० हजार ३०५ रु. किंमतीचा मुद्दमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरील कारवाई श्री. सागर धोमकर विभागीय उपआयुक्त रा.उ.शु.पुणे विभाग पुणे,श्री.प्रमोद सोनोने अधीक्षक, रा.उ.शु.अहिल्यानगर, श्री.प्रवीण कुमार तेली, उपअधीक्षक,रा.उ.शु अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. कुमार टि.ढावरे, निरीक्षक,अ-विभाग, दुय्यम निरीक्षक श्री.उमेश द.ढोले, सुकेशिनी शिंदे,स.दु.नि. एस.बी.लगड,सर्वश्री जवान दिनेश खैरे, नेहाल उके,बळीराम नागरे,विद्या आव्हाड, एस.के.सदगीर यांनी केली आहे.

यापुढे देखील अवैध हातभट्टी गावठी दारू निर्मिती,वाहतूक,विक्री ठिकाणी व अवैध ढाबे यावर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याची माहिती श्री.कुमार टि. ढावरे,निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, अ-विभाग,अहिल्यानगर यांनी असुन अवैध मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल्स्,ढाब्यांबाबत माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील टोल फ्री क्रमांक 18002339999 अथवा व्हॉट्सॲप क्रमांक 8422001133 वर माहिती दयावी,असे आवाहन श्री.कुमार टि. ढावरे,निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,अ-विभाग, अहिल्यानगर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page