भिस्तबाग,सावेडीच्या नागरिकांकडून महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांचे अभूतपूर्व स्वागत;आ.जगताप यांचा पुणेरी टोपी घालून हातात वीणा देऊन पारंपारिक पध्दतीने सन्मान
अहिल्यानगर प्रतिनिधी:-भिस्तबाग,सावेडीच्या नागरिकांकडून महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले.
ठिकठिकाणी जेसीबी वरुन व युवकांकडून फुलांच्या वर्षावाने प्रचार रॅलीचे स्वागत करण्यात आले तर स्वागतासाठी महिला वर्ग पडल्या घराबाहेर….आ.जगताप यांच्या स्वागताला बालगोपालही सरसावले…नगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ सोमवारी सकाळी (दि.18 नोव्हेंबर) भिस्तबाग महल सावेडी येथून नगर विकास यात्रा काढण्यात आली.
यावेळी नागरिकांसह युवक-युवती व महिलांनी मोठ्या उत्साहात आ. जगताप यांचे स्वागत केले.चौकाचौकात महाकाय पुष्पहाराने त्यांचा सत्कार करण्यात आला.आ.जगताप यांना पुणेरी टोपी घालून हातात वीणा देऊन पारंपारिक पध्दतीने सन्मान करण्यात आला.
बाल वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या निनादात,जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करुन आ. जगताप यांचे भक्तीमय वातावरणात स्वागत केले.प्रचार रॅलीत महिलांसह युवकांची संख्या प्रेक्षणीय होती. बालगोपाल देखील स्वागतासाठी हजर होते.प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भिस्तबाग परिसरातून नागरिकांनी आ.जगताप यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक संपत बारस्कर,माजी नगरसेविका मीना चव्हाण,दिपाली बारस्कर, डॉ.सागर बोरुडे,उपनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण,किरण बारस्कर, प्रशांत निमसे,सुनील डोंगरे,अंकुश बोरुडे,सचिन बारस्कर, नितीन बारस्कर,शरद बोरुडे,प्रशांत भालेराव,सतीश ढवन,विलास ढवन, स्वप्नील ढवन,हभप खोसे महाराज, जालिंदर शिंदे,सुरज शिंदे आदींसह मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक उपस्थित होते.