Maharashtra247

गावठी कट्ट्यातून फायर करत लाखोंचे सोने चांदी घेऊन फरार झालेले चोरटे स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद;२० तोळे सोने हस्तगत  

 

अहिल्यानगर प्रतिनिधी:-संगमनेर तालुक्यातील साकुर येथील कान्हा ज्वेलर्स,येथे सशस्त्र दरोडयाच्या गुन्हयातील 5 आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.या आरोपीकडून तब्बल 15 लाख 95 हजार 425 रुपयांचे 20 तोळे सोने हस्तगत केले आहे.

बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी संकेत सुभाष लाळगे (वय 24, रा.साकुर,ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर) हे दि. 11 नोव्हेंबर 2024 रोजी कान्हा ज्वेलर्स,साकुर येथे दुकानामध्ये ग्राहका सोबत बोलत असताना अज्ञात 5 इसमांनी दुकानामध्ये प्रवेश केला.त्यापैकी 3 इसमांकडे गावठी कट्टे असून त्यांनी गावठी कट्टयाचा धाक दाखवून कान्हा ज्वेलर्समधुन 52,41,600/- रूपये किंमतीचे सोने व चांदीचे दागीने चोरी करून घेऊन गेले.याबाबत घारगाव पोलीस स्टेशन येथे गुरनं 402/2024 भा.न्या.सं.2023 चे कलम 310 (2),शस्त्र अधिनियम 3/25 प्रमाणे दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अग्नीशस्त्रासह ज्वेलर्स दुकानावर घडलेल्या दरोडयाची गुन्हयाची प्राथमिक माहिती मिळताच श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अशांनी तात्काळ घटना ठिकाणी भेट देऊन,आरोपीचा शोध घेणे बाबत आदेशीत केले होते.पोलीस पथकाने गुन्हयातील आरोपींचा पाठलाग करून शिक्री, ता.संगमनेर येथील डोंगर परिसरातमधुन 2 आरोपीतांना ताब्यात घेण्यात आलेले होते. नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी गुन्हयातील आरोपीचा शोध घेणेकामी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/ तुषार धाकराव,पोलीस अंमलदार संतोष लोढे, फुरकान शेख,रोहित मिसाळ,भाऊसाहेब काळे,आकाश काळे, अमोल कोतकर, जालींदर माने,अमृत आढाव,संतोष खैरे, मेघराज कोल्हे,प्रशांत राठोड,महादेव भांड, अर्जुन बडे व भाग्यश्री भिटे अशांचे पथक नेमुण वर नमुद गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेणेबाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयामध्ये मनोज साठे, रा.माळशिरस, जि.सोलापूर यास निष्पन्न करुन त्याचा व गुन्हयातील चोरीस गेले मुद्देमालाबाबत तपास करत होते.

तपास पथकास दि.17 नोव्हेंबर 2024 रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी नामे मनोज साठे याने गुन्हयातील चोरी केलेले सोने त्याचा साथीदार धोंडया जाधव, रा.निघोज,ता.पारनेर व सुनिल उर्फ निल चव्हाण,रा.गणेशपेठ पुणे यांचेकडे विक्रीकरीता दिलेले आहे. बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून तपास पथकाने पुणे येथून जाऊन संशयीताचा शोध घेतला असता सुनिल उर्फ निल विजय चव्हाण,वय 28, रा.गणेश पेठ,पुणे हा मिळून आला.त्यास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने गुन्हयातील सोन्याचे दागीने अभिषेक महेश तळेगावकर,रा.रविवार पेठ,पुणे याचेकडे विक्रीसाठी दिल्याचे सांगीतले.

त्यानुसार पथकाने अभिषेक महेश तळेगावकर याचा शोध घेऊन,तपास करून त्याने सदरचे सोने सोमवार पेठ,पुणे येथील सोनाराकडे विकल्याची माहिती दिली.तपास पथकाने पंचासमक्ष सोमवार पेठ,पुणे येथील सोनाराकडून 15,03,425/- रूपये किंमतीचा ( 195.250 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड ) मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. गुन्हयाचे तपासात निष्पन्न आरोपी मनोज साठे बेलवंडी फाटा येथे असलेबाबत मिळालेल्या माहितीवरून पथकाने बेलवंडी फाटा, ता.श्रीगोंदा येथे सापळा रचुन संशयीताचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1)दयावान उर्फ मनोज बाळासाहेब साठे, वय 25, रा.गोरडवाडी, ता.माळशिरस, जि.सोलापूर 2)अजय उर्फ भोऱ्या उर्फ भोल्या बाळु देवकर,वय 22, रा.कौठेयमाई, ता.शिरूर,जि.पुणे 3) योगेश अंकुश कडाळे, वय 27,रा.धामणी, लोणी, ता.आंबेगाव, जि.पुणे व 4)आकाश ठकाराम दंडवते, वय 28,रा.मलठण, ता.शिरूर,जि.पुणे असे सांगीतले.ताब्यातील आरोपीकडून 92,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यात अजय उर्फ भोल्या बाळु देवकर याचे ताब्यातुन 30,000/- रू किंमतीचे गावठी पिस्तुल व 2,000/- रू किं.2 जिवंत काडतुस व आरोपीकडून प्रत्येकी 1 मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडे वर नमूद गुन्हयांचे अनुषंगाने विचारपुस करता, त्यांनी सदरचा गुन्हा 5)धोंडया महादु जाधव (फरार) व 6 )मन्ना उर्फ सुरजसिंग उर्फ अजयसिंग, रा.पंजाब (फरार) अशांनी केला असल्याची माहिती दिली.तपास पथकाने ताब्यात आरोपीतांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपी नामे धोंडया महादु जाधव (फरार) याने वरील सर्व आरोपीतांना एकत्रित करून नमूद गुन्हयांचा प्लॉन तयार केलेला आहे.त्यासाठी आरोपी हे दिवाळी सणाच्या वेळी स्विप्ट गाडीमध्ये साकुर,ता.संगमनेर येथे येऊन कान्हा ज्वेलर्स पाहणी केली.

गुन्हा करण्यसाठी धोंडया महादू जाधव याने वरील आरोपीच्या मदतीने दोन गावठी कट्टे व काडतुस, गुन्हयात वापरलेल्या दोन पल्सर मोटार सायकल या बारामती येथून चोरून आणल्या आहेत.दि.10 नोव्हेंबर 2024 रोजी अक्षय बाळु देवकर,मन्ना व अक्षय वावरे मोटार सायकलवर साकुर येथे येऊन गुन्हा केल्यानंतर पळून जाण्याकरीता परिसरातील रोडची पाहणी केली.आरोपी धोंडया महादु जाधव हा प्रत्यक्ष घटना ठिकाणी न येता त्याने दि.11 ऑक्टोबर 2024 रोजी आरोपी अजय देवकर, अक्षय वावरे,मन्ना, स्वप्नील येळे व मनोज साठे यांना दोन पल्सर मोटार सायकलवर साकुर येथे गुन्हा करण्यासाठी पाठविले व तो बाहेरून आरोपीकडून व्हॉटसअप कॉलद्वारे माहिती घेत होता.आरोपी हे पल्सर मोटार सायकलवर दि.11 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 01.30 वा.सुमारास कान्हा ज्वेलर्स,साकुर येथे येऊन मन्ना याने दुकानादारास पिस्टलचा धाक दाखविला.स्वप्नील येळे हा पिस्टलसह दुकानाचे बाहेर होता.अक्षय देवकर व मनोज साठे याने दुकानातील सोन्याचे दागीने पिशवीत भरले.दुकानातून जाते वेळी मन्ना व स्वप्निल येळे यांनी गावठी कट्टयामधुन प्रत्येकी 1 राऊंड फायर केला.गुन्हा केल्यानंतर आरोपी पळून जात असताना टाकळी ढोकेश्वर येथे रस्ता चुकले.त्याच वेळी पोलीस व लोक आरोपीचा पाठलाग करत असताना आरोपी हे पल्सर मोटार सायकल सोडून शिक्री येथील डोंगरामध्ये पळून गेले.आरोपीपैकी अक्षय बाळु देवकर,मनोज बाळासाहेब साठे व मन्ना उर्फ सुरजसिंग असे रात्रभर डोंगरामध्ये लपून सकाळच्या वेळी आळेफाटा ते नगर जाणारे हायवेला येऊन त्यांनी धोंडया महादु जाधव यास मोबाईल करून हायवेला बोलावून घेतले.धोंडया जाधव हा स्वीफ्ट गाडीने येऊन आरोपीतांना मंचर येथे घेऊन गेला.त्यावेळी गुन्हयातील सोन्याची दागीने असलेली बॅग मनोज बाळासाहेब साठे याचेकडे होती.मंचर येथे पोहचल्यानंतर धोंडया महादु जाधव याने बॅगमधील काही सोन्याचे दागीने मनोज बाळासाहेब साठे यास दिले.गुन्हयात वापरलेले पिस्टल व बॅगमधील काही सोन्याचे दागीने धोंडया महादु जाधव व उर्वरीत सोन्याचे दागीने हे मन्ना उर्फ अजयसिंग उर्फ सुरजसिंग, रा.पंजाब हा घेऊन गेला असल्याची माहिती सांगीतली आहे. ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी घारगाव पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन पुढील तपास घारगाव पोलीस स्टेशन हे करीत आहे.

You cannot copy content of this page