धनगरवाडी येथून अवैधरित्या गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणारा आरोपी जेरबंद एमआयडीसी पोलिसांची कारवाई
अहिल्यानगर प्रतिनिधी:-एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील धनगरवाडी परीसरातून विनापरवाना गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.
बातमीची हकीकत अशिकी,दि.१७ नोव्हेंबर २०२४ रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि.माणिक चौधरी यांना गोपनिय माहिती मिळाली की,धनगरवाडी परीसरात हनुमान मंदीर शिवारात एक इसमा जवळ बेकायदेशिरपणे एक गावठी कट्टा व काडतुस जवळ बाळगत आहे.त्यावरुन सपोनी.चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन सदर आरोपीला धनगरवाडी येथे सापळा लावुन पकडले असता त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गाव निलेश बाबासाहेब ससाणे (वय-२३ वर्ष रा.सिदधार्थनगर) असे सांगितले.त्याच्या कडे एक गावठी कटटा व एक जिवंत काडतुस असा एकुण २५,५००/-रु.किंमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला आसुन त्याच्या विरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे पोकॉ/१२१० किशोर सुभाष जाधव यांच्या फिर्यादीवरुन गुरनं ८६०/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण विभाग अहिल्यानगर यांचे मार्गदर्शानाखाली सपोनि.माणिक चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन,पोसई.विकास जाधव,पोसई.देविदास भालेराव,पोहेकॉ.राजु सुद्रिक,पोकॉ.किशोर जाधव,पोकॉ.भगवान वंजारी,पोकॉ.सुरेश सानप यांचे पथकाने केली आहे.