केडगाव येथे नगर विकास यात्रेचे जल्लोषात स्वागत;लाडक्या बहिणींनी आपल्या संग्राम भैय्यांचे उत्स्फूर्तपणे केले स्वागत
अहिल्यानगर प्रतिनिधी:-महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ केडगाव परिसरातील भूषण नगर येथून नगर विकास यात्रा काढण्यात आली.
यावेळी लाडक्या बहिणींनी आपल्या भैय्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. तर स्वागताला आलेल्या महिलांशी आ.जगताप यांनी दिलखुलासपणे संवाद साधला.घराघरातून आमदार संग्राम जगताप यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.
चौका-चौकात युवकांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. तर आ. जगताप यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठी-भेटी घेतल्या. आ. संग्राम जगताप यांच्या नगर विकास यात्रेला केडगावकरांचा उस्फूर्त प्रतिसाद भेटत असून आमदार संग्राम जगताप यांनी केडगाव परिसरात विविध विकास कामे केल्यामुळे आमदार संग्राम जगताप यांना पुन्हा तिसऱ्यांदा आमदार पदी निवडून देणार असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.