भिंगार कॅम्प पोलीसांचा ड्रोन कॅमेराव्दारे वॉच
अहिल्यानगर प्रतिनिधी:-भिंगार कॅम्प पोलीसांचा ड्रोन कॅमेराव्दारे निवडणुकीत वॉच राहणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने होणारी मतदार प्रक्रिया ही निर्भयपणे पार पडुन सर्वसामान्य मतदार यांना मतदानाचा हक्क बजविता यावा या करीता भिंगार कॅम्प पोलीसांकडुन ड्रोन कॅमरेव्दारे वॉच ठेवण्यात येत असुन मतदारांना कोणतेही प्रलोभन,दारु,पैसे,भेटवस्तु देणे तसेच धमकी अगर भिती दाखविणे या सारखे प्रकार घडणार नाहीत यावर ड्रोन कॅमरेव्दारे वॉच ठेवण्यात येत आहे.
या वेळी भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदिश मुलगीर यांनी मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचे अवाहन केले आहे.