हद्दपार केलेल्या तरुणास भिंगार कॅम्प पोलिसांनी केले जेरबंद;हद्दपार केलेले असताना फिरत होता भिंगार शहरात
अहिल्यानगर प्रतिनिधी:-सार्वत्रीक विधानसभा निवडणुक व मतमोजणी प्रक्रिये दरम्यान सार्वजनिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल त्या अनुषंघाने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हददीतील अभिषेक ऊर्फ अभि अशोक शेलार (रा. भिमनगर पाथर्डी रोड भिंगार ता. जि.अहिल्यानगर) यांना हददपार केले बाबतचा आदेश श्री.सुधिर पाटील उपविभागीय दंडाधिकारी नगर भाग अहिल्यानगर यांनी दोन वर्षाकरीता अहिल्यानगर जिल्हयातुन हृददपार केले होते.
सदर हददपार इसम हा शुक्रवार बाजार भिंगार शहर येथे चहाच्या टपरीवर येणार आहे अशी खात्रीशीर बातमी तपास पथकातील अंमलदार यांना मिळाल्याने सदरची माहिती सहा.पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना सांगितल्याने त्यांनी सदर ठिकाणी जावुन कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन सापळा लावला असता जिल्हयातुन हददपार झालेला इसम यास पोलीस आल्याची चाहूल लागताच पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास तात्काळ ताब्यात घेवून त्याचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदया अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे,चंद्रकांत माळोदे,पोहेकॉ.दिपक शिंदे,संदीप घोडके,रवी टकले,पोकॉ.प्रमोद लहारे,समीर शेख यांनी केली आहे.