अहिल्यानगर प्रतिनिधी:-खुनाच्या गुन्हयातील १५ दिवसापासून फरार असलेल्या ०५ आरोपींना पकडण्यात तोफखाना पोलीसांना यश आले आहे.
बातमीची हकीकत आशिकी,दि.०२ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री एलसीबीच्या पोलीसांना तलवारी विकण्याच्या बातमी देतो या कारणावरुन तरुणास लाकड़ी दांडक्याने व दगडाने मारहाण करुन जखमी मयत नामे करण अर्जुन साळंके हा दि. १३ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी सिव्हील हॉस्पीटल अहिल्यानगर येथे औषधोपचार घेत असताना मयत झाला असुन सदर बाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुरन १९१ (३), १९०,३५२, ३५१ (२)(३), महा पोलीस कायदा कलम ३७ (१)(३)/ १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्हयातील आरोपी नामें १)संतोष भैरुनाथ पवार वय.३९ वर्षे रा,मंगलगेट जे.जे गल्ली,अहिल्यानगर २) रंजित एकनाथ साळुंके वय ३४ वर्षे रा.वाबळे क्रेशरचे मागे, गजराजनगर,अहिल्यानगर ३)सचिन भिमराव ऊर्फ लल्लु पवार वय ३७ वर्ष रा.कड़ा,ग्रामपंचायत समोर बाजारतळ,ता. आष्टी जिल्हा बीड,४) सचिन सर्जेराव चव्हाण, वय-३३, रा.जे.जे.गल्ली मंगलगेट, ता.जि.अहिल्यानगर, ५) प्रविण सुभाष पवार, वय-३२, रा.-भिस्तबाग चौक,ता.जि. अहिल्यानगर यांना तोफखाना पोलीसांनी शिताफीने पुणे जिल्हयातुन ताब्यात घेवुन त्यांना अटक केली असुन त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची दि.२२ नोव्हेंबर २०२४ रोजी पोलीस कस्टडी रिमांड असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोनि. श्री.आनंद कोकरे हे करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खेरे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.श्री.आनंद कोकरे,सपोनि.श्री.उज्वलसींग राजपुत,पोउपनिरी.श्री.सचिन रणशेवरे, पोउपनिरी.श्री.शैलेश पाटील,पोहेकॉ.दत्तात्रय जपे,सुनिल शिरसाट, आहमद इनामदार, भानुदास खेडकर,योगेश चव्हाण,गणेश धोत्रे, सुधीर खाडे,सुरज वाबळे,वसीम पठाण,सुमीत गवळी, शिरीष तरटे,सतिष त्रिभुवन,दत्तात्रय कोतकर,बाळासाहेब भापसे,सतीष भवर, राहुल म्हस्के,संदिप गि.-हे. यांनी केली आहे.