आर्किटेक्ट इंजिनियर्स सर्वेयर्स असोसिएशनच्या सभासदांनी मतदार म्हणून मतदानाचा हक्क बजावण्याची घेतली प्रतिज्ञा
अहिल्यानगर प्रतिनिधी:-जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अहिल्यानगर स्विप समिती-यांच्या अहवानास सकारात्मक प्रतिसाद देत आर्किटेक्ट इंजिनियर्स सर्वेयर्स असोसिएशनच्या २०० पेक्षा जास्त सभासदांना मतदार म्हणून मतदानाचा हक्क बजावण्याची प्रतिज्ञा घेतली.हि प्रतिज्ञा संचालक इंजी.यश प्रमोद शहा यांनी दिली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ दहिफळे,सेक्रेटरी अभिजीत देवी, संचालक प्रदीप तांदळे,जितेश सचदेव, नंदकिशोर घोडके,भूषण पांडव,सुनील औटी,मयुरेश देशमुख, तसेच सभासद विजयकुमार पादिर, राजकुमार मुनोत,रत्नाकर कुलकर्णी,सलीम शेख व इतर 200 पेक्षा जास्त सभासद उपस्थित होते. यावेळी बोलताना अध्यक्षांनी शंभर टक्के संस्थेच्या सर्व सभासदांनी आपल्या कुटुंबासह मतदान करावे असे आवाहन केले. ५५० पेक्षा जास्त संस्थेचे सभासद आहेत.संस्था ३६ वर्षे जुनी असून तांत्रिक कार्यक्रमासह सामाजिक कार्यतही नेहमीच अग्रेसर असते.