Maharashtra247

माजी आमदार श्रीरामपूर मतदार संघाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीवर अज्ञातांनी केला मध्यरात्री गोळीबार 

 

अहिल्यानगर प्रतिनिधी:-अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीवर मंगळवारी (ता.१९) मध्यरात्री गोळीबारची घटना घडली आहे.

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,काल (ता.१९) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास डॉ.संजय फरगडे,जनार्धन गालपगारे हे मातापूर येथे माझे कार्यकर्ते संजय लबडे यांच्या कारमध्ये चेतन तनपुरे यांचेसह मतदार संघात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी गेलो होतो. तेथे पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटून आम्ही चौघे कारमध्ये बसून रात्री १ च्या सुमारास श्रीरामपूरकडे निघालो.चालकाच्या शेजारील सिटवर मी बसलेलो होतो.त्यावेळी प्रवास करत असतांना माझ्या लक्षात आले की,दोन दुचाकीवर पाठलाग करत होते.त्याबाबत मी माझ्या सोबतच्या लोकांना सांगितले.काही अंतर गेल्यानंतर रस्त्यात अशोक सहकारी साखर कारखाना, अशोकनगरचे मुख्य प्रवेशद्वार आले. संरक्षणासाठी कारखान्याच्या गेटमधून कार आत घेण्याला कांबळे यांनी चालकाला सांगितले.

चालकाने कारच्या प्रवेशद्वाराकडे वळविली परंतु त्यावेळी कारखान्याचे प्रवेशद्वार अर्धवट बंद होते. त्यामुळे आमची कार आत जाऊ शकली नाही म्हणुन चालकाने कार उभी केली.त्यादरम्यान पाठलाग करणाऱ्या दोन दुचाकीवरील व्यक्तींनी त्यांच्या दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभ्या करुन तीन व्यक्ती अंदाजे २० ते २५ वयोगटातल्या त्यापैकी दोघे समोर चालत आले.त्यामुळे मी चालकाला आमची कार मागे घेऊन पुन्हा श्रीरामपूरच्या दिशेने घेण्यास सांगितली.

चालक तनपुरे हा कार मागे घेत असतांना कारच्या समोरील तिघांपैकी सडपातळ बांध्याच्या एका व्यक्तीने पिस्तूल काढुन आमच्या कारच्या दिशेन एक गोळी फायर केली. मात्र, आमची कार वेगात मागे घेतल्याने ती गोळी गाडीला न लागता हवेत गेली. त्यानंतर आम्ही कार वेगात चालवून श्रीरामपूरच्या दिशेने आलो. श्रीरामपूरमध्ये येऊन आम्ही प्रकाश चित्ते यांच्या घरी गेलो. त्यानंतर घडले प्रकाराबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याला येऊन तीन अज्ञात व्यक्तीं विरुध्द फिर्याद दिली.

You cannot copy content of this page