Maharashtra247

हिवरगाव पावसा येथे मतदानास नागरिकांचा उस्फूर्तपणे प्रतिसाद‌;नावे शोधण्यासाठी मतदारांची बूथवर मोठ्या प्रमाणात गर्दी

 

संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा गावामध्ये जिल्हापरिषद शाळेत असलेल्या मतदान केंद्रात सकाळपासून नागरिक उस्फूर्तपणे मतदान करताना दिसत आहे.

मतदान करण्यासाठी मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहे.मतदान केंद्रावर उत्स्फूर्तपणे महिला,पुरुष,तरुण वर्ग येत आहे.मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे.तसेच मतदान केंद्राबाहेर असलेले असलेल्या बूथवर आपले नाव व मतदान केंद्र खोली क्रमांक शोधण्यासाठी मतदार गर्दी करत आहे.तर दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान केंद्र 238 वर 68.13%,249 मध्ये58.16% 240 मध्ये 61% मतदान झाले आहे.हिवरगाव पावसा चंदनापुरी, झोळे निमगाव टेंभी, शिरपूर इत्यादी मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात नागरिक उस्फूर्तपणे मतदान करण्यासाठी आल्याचे रांगा लावल्याचे दिसत आहे.

You cannot copy content of this page