संगमनेरमध्ये जायंट किलर अमोल खताळ यांचा ऐतिहासिक विजय;हिवरगाव पावसा येथे महायुतीच्या विजयोत्सव पेढे वाटून साजरा
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):– महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा विधानसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला.महायुतीचे नवखे उमेदवार असलेले अमोल खताळ यांनी त्यांचा 12000 मतांनी पराभव केला.
बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाने अनेक वर्षानंतर संगमनेरात विरोधी पक्षाचा झेंडा फडकला आहे.अमोल खताळ यांच्या विजयाची बातमी समजताच तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा विजयोत्सव पेढे वाटून साजरा केला.डिजेच्या तालावर नाचत जेसीबीतून गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोश करत विजयोत्सव साजरा केला.संगमनेर येथील भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली.सकाळी पहिल्या फेरीपासून अमोल खताळ यांनी आघाडी घेतली.प्रत्येक फेरीत खताळ यांचे मताधिक्य वाढवत होते.संगमनेर शहरातील काही अपवाद वगळता तालुक्यातील ग्रामिण भागातील प्रत्येक मतदान केंद्रावर अमोल खताळ यांना मताधिक्य मिळाले आणि हे मताधिक्य शेवटपर्यंत टिकून राहिल्याने अमोल खताळ यांचा ऐतिहासिक विजय संपन्न झाला.
राजकारण आणि समाजकारणाची जाण असलेले अमोल खताळ हे संघटन कौशल्याच्या बळावर काँग्रेसचे दिग्गज नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव करत जायंट किलर ठरले.अमोल खताळ यांच्या विजयाची चाहूल लागताच सातव्या फेरी पासून भाजप कार्यालय तसेच कॉनरा बॅक चौकात कार्यकर्ते एकत्र जमायला सुरुवात झाली.आठराव्या फेरी नंतर डीजेच्या तालावर कार्यकर्ते, महिला,पुरुष,मुले गुलालाची उधळण करत नाचू लागले.अमोल खताळ यांच्या विजयाची बातमी येताच भाजपा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोश करत पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला.यावेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,केशव दवंगे,शाखा प्रमुख गणेश पावसे,उपसरपंच सुजाता दवंगे,ग्रामपंचायत सदस्य किरण पावसे,देवगड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त उत्तम जाधव,सेवानिवृत्ती पोलिस निरीक्षक नारायण पावसे,कैलास दिवटे,कला साम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीन भालेराव,दिपक भालेराव, भाऊसाहेब बोऱ्हाडे,सचिन सस्कार,मच्छिंद्र गडाख,विनोद पावसे,माधव दवंगे,बाळासाहेब भालेराव,सोमनाथ दवंगे,लहानू भालेराव,विलास पावसे,सुधाकर पावसे,तसेच भाजप,शिवसेना (शिंदे),आरपीआय कार्यकर्त्यांसह हिवरगाव पावसा ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.