Maharashtra247

ECI Dy Commissioner,State CEO present Assembly Election Gazette to Maha Governor 

 

 

Mumbai:-The Deputy Election Commissioner of Election Commission of India Hirdesh Kumar and Chief Electoral Officer, Maharashtra State S. Chockalingam called on Maharashtra Governor C P Radhakrishnan and presented the copies of the Gazette containing names of members elected to the Legislative Assembly of Maharashtra and ECI’s Notification at Raj Bhavan Mumbai on Sunday (24 Nov).

 

The results of General Elections to Maharashtra Legislative Assembly were declared on 23rd November. The names of elected candidates of the election were published in Maharashtra Government State Gazette vide Election Commission of India’s Notification dated 24th November, 2024. This was done as per the provisions contained in Section 73 of the Representation of People Act, 1951.

The Deputy Election Commissioner, ECI and the State Chief Electoral Officer, Maharashtra presented copies of the said Gazette containing ECI’s Notification to the Governor.

Additional Chief Electoral Officer from the office of Chief Electoral Officer, Maharashtra State Kiran Kulkarni, Joint Chief Electoral Officer Manohar Parkar and Secretary, ECI Suman Kumar Das and Section Officer Niranjan Kumar Sharma from Election Commission of India were also present.

राज्य विधानसभा निवडणुकीची अधिसूचना, राजपत्राच्या प्रती राज्यपालांना सादर

 

मुंबई (दि.२४ प्रतिनिधी):-भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची रविवारी (दि. २४) राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना – निवडून आलेल्या सदस्यांची यादी – व राजपत्राची प्रत सादर केली.

महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांचे निकाल दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहिर करण्यात आले. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलम ७३ मधील तरतूदीनुसार, या निवडणूकीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची नावे, भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक २४ नोव्हेंबर, २०२४ च्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली.

सदर राजपत्र व अधिसूचनेच्या प्रती निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी आज राज्यपालांना सादर केल्या.

यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, भारत निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास व कक्ष अधिकारी निरंजन कुमार शर्मा हे देखील उपस्थित होते.

You cannot copy content of this page