अहिल्यानगर ((दि.२५ प्रतिनिधी):-अहिल्यानगर रोलबॉल व एरोस्केटोबॉल स्पर्धा निवड चाचणी रविवार २४ नोव्हेंबर रोजी वाडियापार्क येथे संपन्न झाल्या.
सालाबादप्रमाणे अहिल्यानगर जिल्हा रोलबॉल स्पर्धा (वयोगट ११ वर्षे व १७ वर्षे मुले व मुली) तसेच अहिल्यानगर जिल्हा एरोस्केटोबॉल स्पर्धा (वयोगट ११ वर्षे १४ वर्ष तसेच सीनिअर मुले व मुलींची जिल्हास्तर स्पर्धा व संघ निवड चाचणी जिल्हा क्रीडा संकुल वाडियापार्क येथे संपन्न झाल्या.सदर स्पर्धांसाठी जिल्ह्यातील विविध शाळंमधील तसेच प्रशिक्षण संस्थांमधून एकूण ११० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे अधयक्षस्थानी संघटनेचे कार्याध्यक्ष श्री.संजय नन्नवरे हे होते.
या वेळी संघटना अध्यक्ष श्री. प्रदीप पाटोळे यांनी खेळाडूंना संबोधित करत पालक,खेळाडू तसेच व्यासपीठावरील उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले या वेळी संघटना सचिव श्री. प्रशांत पाटोळे,श्री.प्रविण गायकवाड (टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन) कार्याध्यक्ष,श्री.विशाल साळवे रोल बॉल संघटना सदस्य,श्री.राजू पवार क्रीडा मार्गदर्शक श्री.शैलेश गवळी जिल्हा ऑलिंपिक संघटना,अरुणोदय क्रिडा प्रतिष्ठान चे श्री.महेश आनंदकर सर,श्री.अविनाश काळे अध्यक्ष टेनिस बॉल क्रिकेट संघटना,गुलमोहर फुटबॉल क्लबचे श्री.प्रसाद पाटोळे,श्री.मयूर टेमरे,श्री.सचिन गायकवाड (टेनिस बॉल क्रिकेट संघटना) सचिव,पंच म्हणून श्री.किरण माने,श्री.सचिन भापकर,श्री.अमोल ठोंबे श्री.अक्षय चौधरी राष्ट्रीय थाय बॉक्सिंग राष्ट्रीय खेळाडू कु.दर्शना कथेड,पीयूष कदम,कू.तनुज नन्नवरे,श्री.श्रीकांत कसाब,श्री.नवाज शेख यांनी काम पाहिले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.