अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर पीपल्स रिपब्लिकन पक्षाची जिल्हा तालुका,शहर कार्यकारणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे सर व लघु उद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या आदेशानुसार बरखास्त केली असल्याची घोषणा पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी केली आहे.
लवकरच नवीन कार्यकारणी नेत्यांच्या आदेशानुसार करण्यात येईल तसेच पक्षासाठी कार्यरत व पक्षाच्या आदेशानुसार काम करणाऱ्या व्यक्ती यांना पक्षात स्थान देण्यात येणार असून ज्यांना पीपल्स रिपब्लिकन पक्षात काम करायचे असेल त्यांनी पक्ष कार्यालय अ.नगर येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले आहे.