Maharashtra247

चेष्टेमुळे वाद निर्माण होऊन मित्रावर कात्रीने वार..खून 

 

अहिल्यानगर प्रतिनिधी:अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरातील एका मेडिकलमध्ये काल (शुक्रवारी) रात्री दोन मित्रांमध्ये चेष्टा चालली होती.

त्यातून आलेल्या रागातून शमसुद्दीन निजामुद्दीन खान (रा. मुकुंदनगर अहमदनगर) याने त्याच्या मित्राचा जीशान रुस्तमअली खान याचा खून केल्याची घटना समोर आली आहे.चेष्टा मस्करीतून कात्रीने वार करून खून करण्यात आला होता.

याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुरनं ७९१/२०२४ भा.न्या.सं २०२३ चे कलम १०३ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सपोनी/जगदीश मुलगीर करीत आहे.

You cannot copy content of this page