कॉलेजच्या मुला-मुलींना कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणा-या कॅफे चालकांवर कोतवाली पोलीसांची धडक कारवाई
अहील्यानगर प्रतिनिधी:-कॉलेजच्या मुला-मुलींना कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणा-या कॅफे चालकांवर कोतवाली पोलीसांनी धडक कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे.
दि.०२ डिसेंबर २०२४ रोजी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली आहे की,अहिल्यानगर शहरामध्ये द परफेक्ट कॅफे कोर्ट गल्ली कर्डीले डायग्नोस्टीक समोर अहिल्यानगर येथे कॅफेच्या आत मध्ये प्लायवुडचे कंम्पार्टमेंट करुन पडदे लावुन अंधार करुन शाळा कॉलेजमधील मुला मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देत असुन अशी गोपणीय बातमी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री.प्रताप दराडे साहेब यांना मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन खात्री करुन तात्काळ छापा टाकुन कारवाई करणे बाबत कोतवाली गुन्हे शोध पथकास तोंडी आदेश दिल्याने सदर ठिकाणी पंचासमक्ष पथकाने छापा टाकला असता सदर ठिकाणी प्लाऊड बोर्डचे पार्टीशन करुन वेगवेगळे कंपार्टमेंट केलले दिसले त्यात काही कॉलेजचे मुले व मुली हया अश्लील चाळे करताना मिळुन आले.
काउन्टरवर असलेल्या इसमास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारणा केली असता त्यांने त्याचे नाव अनुज शिवप्रसाद कुमार (वय २० वर्षे रा.प्ररबुजुर्ग फतेहपुर उत्तर प्रदेश ह.रा.स्वामी शंकर हॉटेल कल्याण बायपास अहिल्यानगर) असे असल्याचे सांगुन मी सदर कॅफेचा मॅनेजर असल्याचे सांगितले सदर कॅफेचा मालक बाबत विचारना केली असता महेश पोपट खराडे रा.रभाजी नगर केडगाव अहिल्यानगर सदर कॅफेचे कामकाज हेच पाहत असल्याचे सांगितले सदर कॉलेजचे मुले व मुली यांना त्यांचे नाव गाव विचारुन खात्री करुन त्यांचे वय व ओळख पत्राची पाहणी करुन त्यांना तोंडी समज देवुन सोडण्यात आले तरी सदर कॉफी शॉपचे चालक व मालक यांचे विरुध्द पोकॉ/सतिष शिंदे यांचे फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन गुरनं। /२०२४ विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९.१३१ (क) (क) अन्वये प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाचे मसपोनि/योगीता कोकाटे,सपोनि.विकास काळे,पोहेकाँ योगेश भिंगारदिवे,विशाल दळवी,सलिम शेख, चापोहेकॉ/संभाजी कोतकर,पोकों/अभय कदम,अमोल गाढे,रिंकु काजळे,अनुप झाडबुके, सतीष शिंदे,मपोकाँ/पुजा दिख्खत,कोमल जाधव,पल्लवी रोहकले यांनी केली आहे.