Maharashtra247

एच.आय.व्ही.संसर्गित रुग्णांनी आपली मानसिकता बदलून समाजाच्या मुख्य प्रवाहात येणे आवश्यक डॉ.विक्रम पानसंबळ

 

 

                                                        अहील्यानगर (दि.३ प्रतिनिधी):-  एच.आय.व्ही. संसर्गित व्यक्तीनी योग्य पद्धतीने आहार,उपचार घेतल्यास आरोग्य स्थिती उत्तम रहाते.आपण कोणत्याही गोष्टीचा विचार न करता मानसिक संतुलन योग्य ठेवल्यास शंभर वर्षी आयुष्य आपण जगू शकतो.अे.आर.टी. उपचार पद्धतीमध्ये अनेक नवे नवीन प्रयोग करून एच.आय.व्ही.संसर्गीताचे जीवन सूकरीत करण्याचे काम शासनाकडून होत आहे.

एच.आय.व्ही.संसर्गीत व्यक्तींमध्ये समायोजन, अडथळे,संवाद,हलगर्जीपणा आणि शिक्षण यांमध्ये समन्वय नसेल तर आयुष्याचे नुकसान होवू शकते.कोरोनाच्या काळात खूप कमी एच.आय.व्ही.संसार्गीतांना कोरोनाची लागण झाली याचे प्रमुख कारण आपण नियमित आपले ए.आर.टी. औषधे घेतात एच.आय.व्ही. संसर्गित रुग्णांनी आपली मानसिकता बदलून समाजाच्या मुख्य प्रवाहात येणे आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हा रुग्णालयाचे ए.आर.टी. विभागाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम पानसंबळ यांनी केले. 

जागतिक एच. आय. व्ही./एड्स सप्ताहनिम्मित स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्पाने आयोजित केलेल्या सहजीवनाची ओढ असणाऱ्या एच.आय.व्ही./एडस संसर्गितांसाठी राज्यस्तरीय वधू – वर परिचय मेळावा कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विहान प्रकल्प संचालक प्रशांत येंडे , रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष नितीन थाडे,सदस्य चंद्रकांत पंडित,मानव्य संस्था पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा जयकर, स्नेहाधार प्रकल्पाचे मानद संचालक एडव्होकेट श्याम आसावा,स्नेहालय संस्थेचे संचालक प्रविण मुत्याल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.प्रशांत येंडे यांनी महाराष्ट्रातील एच.आय.व्ही./एडस संसर्गित व्यक्तींच्या सद्यस्थिती बाबत माहिती देवून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम हाती घेतले आहे.प्रत्येकाने मनामध्ये भीती न बाळगता आपले सहजीवन जोडीदार योग्य पद्धतीने निवडावे असे आवाहन केले.एडव्होकेट श्याम आसावा यांनी आपले दुख हेच आपले सौंदर्य आहे.आपण आपले दुख न लपवता खुलेआमपणे त्याचा स्वीकार करून पुढील उज्ज्वल आयुष्य जगले पाहिजे,असे सांगितले.

सध्या वर्तमान स्थितीत अनेक व्यक्ती वेगवेगळ्या मुलींचे फोटो दाखवून आर्थिक फसवणूक करीत आहेत.आपण सर्वांनी या फसवणुकीपासून सावध रहावे, असे आवाहन त्यांनी केले

व्यायाम,योगा करणे महत्वाचे

नितीन थाडे यांनी आपल्या मनोगतात एच.आय.व्ही./एडस संसर्गितांनी आपली गोळ्या औषधे तर वेळेवर घ्यायचीच त्याच बरोबर योगा व व्यायाम करणे महत्वाचे आहे, असे सांगितले.मुद्रा कर्ज बाबत माहिती देवून त्याचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.प्रवीण मुत्याल यांनी आपल्या प्रस्ताविकतेत एच.आय.व्ही.सह जीवन जगणाऱ्या संसर्गीतांचे आपले जीवन आशय संपन्न करण्यासाठी इतर दुर्धर आजारी रुग्णांचे जीवन विकसित करण्याची महत्वपूर्ण प्रेरणा देणे, हा स्नेहालयाच्या कामाचा एक प्रमुख भाग आहे. स्नेहालयाने एच.आय.व्ही. सह जीवन जगणाऱ्या संसर्गीतांचे व्यक्तीचे जीवन सुकर करण्यासाठी केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरची उभारणी केली. त्यामुळे एच.आय.व्ही. सह जीवन जगणाऱ्या संसर्गीतांना नवी उमेद –दिशा –आशा मिळावी यासाठी स्नेहालय संस्थेने सन २०१४ पासून दरवर्षी २ डिसेंबरला राज्यस्तरीय वधू – वर परिचय मेळाव्याचे आयोजन करीत आहे. मागील दहा वर्षात ५५०० पेक्षा जास्त वधू – वरांनी आपली नावनोंदणी केली आहे.मागील दहा वर्षात ८३ जोडप्यांनी आपले सहजीवन निवडले. दरवर्षी १५ डिसेंबरला सामुदायिक विवाहद्वारे या ८३ जोडप्यांचे लग्न स्नेहालयाने लावून दिले आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यातील १८ जोडप्यांना जी मुले झाली आहेत ती सर्व बालकांचे एच.आय.व्ही. चे अहवाल (रिपोर्ट) नकारात्मक (निगेटिव्ह) आले आहेत. एच.आय.व्ही./एडस संसर्गित व्यक्तींसांठी स्नेहालय संस्थेमार्फत राबवीत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये मुख्यतः केरिंग फ्रेडस हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा – सुविधा व भविष्यकालीन नियोजनाबाबत माहिती दिली.

एच.आय.व्ही./एडस संसर्गित व्यक्तींना कोणत्याही राज्यस्तरीय वधू -वर परिचयात राज्यातील विविध जिल्ह्यातील ३०० पेक्षा जास्त एच.आय.व्ही. संसर्गितांनी आपली नावनोंदणी केली. एच.आय.व्ही. संसर्गित व्यक्तींसोबत आलेल्या नातेवाईकांची संख्या लक्षणीय होती. राज्यस्तरीय वधू – वर परिचयात निवड झालेल्या ७ जोडीदारांचे येत्या १५ डिसेंबर २०२४ रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती स्नेहाधार प्रकल्पाच्या प्रमुख विद्या घोरपडे यांनी सांगितले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री पाठक यांनी केले तर उपस्थितांचे आभार विद्या घोरपडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ दाभाडे, निखील चुटे,पुष्पा चौधरी,श्वेता कंदी, रुपाली सोयम,रुपाली पारिसे,यश पानपाटील,मंदाकिनी मोकळे,कोमल मोकळे, अमर पाटील,पल्लवी भिंगारदिवे,कावेरी रोह्कलेदिपक बुरम,आकाश काळे,प्रविण बुरम, विशाल कापसे,अजय वाकडे,मुस्ताक पठाण, प्रविण कदम,शाहीद शेख,मनोज देशपांडे,गौरी लोणारे,किरण मानकर,विनायक महाले, स्वप्नील मोकळ,विजय थापा,सागर भिंगारदिवे,प्रियंका कोंगळे,सलोनी पाईकराव, समाधान धालगडे,रेखा पाथरकर,नितीन मोरे, आदित्य लाड,अशोक अकोलकर,राजेंद्र शिंदे, राहुल लवांडे आणि संदीप खरात आदींनी परिश्रम घेतले.

दीपक बुरम

प्रकल्प व्यवस्थापक

९०११११३४८०

You cannot copy content of this page