शेतकऱ्यांच्या समृद्धीचा महामार्ग खुला करणारा देवदैठण ढवळगाव येवती शिवरस्ता अखेर खुला
अहिल्यानगर प्रतिनिधी:-श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव,येवती, शिवरस्ता खुला करण्यात आला असून हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या समृद्धीचा महामार्ग खुला होत असल्याचे महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे व राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी प्रशासनाचे आभार मानले.
सदर रस्ता खुला करण्यासाठी सरपंच जयश्री विश्वास गुंजाळ यांनी तहसीलदारांकडे अर्ज दाखल केला होता श्रीगोंदा तालुक्यात प्रलंबित शेतरस्ता केसेस संदर्भात श्रीगोंदा शिव पानंद शेतरस्ता कृती समितीच्या माध्यमातून सदर रस्त्यांच्या प्रश्नांवर शरद पवळे व दादासाहेब जंगले यांच्या नेतृत्वाखाली राजेंद्र नागवडे,ॲड.गोरख कडूस पाटील,अविनाश भवर,राम अडसरे गुरुजी,परेशभाई वाबळे,सुनील गायकवाड,गुरु गायकवाड,जालिंदर कातोरे,बापूराव जंगले,किरण कुरुमकर, यांनी वेळोवेळी आंदोलन करत प्रशासनाला कार्यवाही करण्यास भाग पाडले सदर रस्त्याच्या मोजणीसाठी भू कर मापक अजिंक्य औताडे यांनी हद्द निश्चित करून दिली,त्यानंतर महसूल विभाग देवदैठण मंडळ अधिकारी गिरीश गायकवाड,महसूल अधिकारी संगीता मगर,ग्राम महमूल विभाग अधिकारी येवती,ढवळगाव, ग्रामविकास अधिकारी विजय मोरे यांनी रस्ता खुला करण्यासाठी काम सुरू केले आहे.
देवदैठण, येवती ढवळगाव शिव रस्ता एक ते दीड किलोमीटर अंतराचा आहे यावेळी देवदैठण तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र कौठाळे,वसंत बनकर,काशिनाथ कौठाळे,विश्वास गुंजाळ,रवींद्र शिंदे,बबन शिंदे,रूपाली दिवटे, विलास दिवटे,ग्रामविकास अधिकारी दिलीप रासकर,सुरेश इगावे, बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मारुती कोळपे,पोलीस नाईक शरद गांगर्डे,पोलीस कॉन्स्टेबल उत्तम राऊत,कविता माने,महसूल सेवक अकबर शेख,लिंबराज फंड,आदीं बहुतांश शेतकरी उपस्थित होते अनेक वर्षानंतर हा रस्ता खुला झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले त्याचबरोबर महाराष्ट्र चळवळीचे शरद पवळे व दादासाहेब जंगले यांनी श्रीगोंदा तहसिलदार डॉ.क्षितिजा वाघमारे व देवदैठण ग्रामस्थांचे विशेष आभार मानत इतर गावांनी याचा आदर्श घ्यावा असे यावेळी मत चळवळीच्या वतीने व्यक्त करण्यात आले.