शहरातील ज्ञानेश्वर चौक येथे डासांच्या प्रादुर्भावाने फवारणी.. नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण..सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई यांच्या पाठपुराव्याला यश..
लातूर (प्रतिनिधी):-जिल्ह्यात पावसाचे वातावरण असल्याने साथीचे आजारही जोमाने वाढू लागले आहे.त्यातच डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरीक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे.शहरातील ज्ञानेश्वर चौक स्थानिक रहिवाशी यांनी सामाजिक कार्यकर्त्या तथा लातूर शहराच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मंडल अध्यक्षा निर्मलाताई कांबळे यांना डासांमुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या त्रासाची माहिती दिली.

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या निर्मलाताई कांबळे यांनी लागलीच महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी बोलावून त्यांना येथील परिस्थितीची माहिती दिली व येथे फवारणी करण्याची विनंती केली महापालिका कर्मचारी यांनी तात्काळ या ठिकाणी वेळ न दडवता परिसरात फवारणी केली या मुळे सदरील परिसर हा डासमुक्त झाला.यावेळी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत निर्मलाताई कांबळे यांचे आभार मानले.