पर्युषण महापर्व निमित्त जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने आणि मांसविक्री केंद्र बंद ठेवण्याचे शासन आदेश जारी..इंजी.यश शहा यांच्या प्रयत्नांना यश
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-दरवर्षी प्रमाणे जैन धर्मियांचे पर्युषण महापर्व दि. 20 ऑगस्ट 2025 पासून संपूर्ण देशात साजरे केले जाते आहे.जैन समाजाच्या वतीने मिशन सेफ विहार ग्रुपचे अध्यक्ष इंजी.यश प्रमोद शहा यांनी महाराष्ट्र शासन आदेश तसेच ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया यांचे याबाबतचे परिपत्रक जोडून ईमेलद्वारे निवेदन पाठवून अहिल्यानगर जिल्हाप्रशासन यांना शासन आदेशा प्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्युषण महापर्व निमित्त दरवर्षी प्रमाणे प्रथम दिवशी आणि शेवटच्या दिवशी 27,28ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने आणि सर्व प्रकारचे मांस विक्री केंद्र जिल्हात बंद ठेवण्यात यावे या बाबत विनंती केली होती.
त्याला अनुसरून महाराष्ट्र शासन आदेशा प्रमाणे दरवर्षी प्रमाणे अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने 27,28ऑगस्ट रोजी याबाबत कत्तलखाने व मांस विक्री बंद ठेवण्या बाबतचे आदेश पारित केले आहे.प्रशासनाने याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक,महापालिका आयुक्त,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद, उपविभागीय दंडाधिकारी सर्व, जिल्हाप्रशासन अधिकारी नगरपालिका शाखा,तहसीलदार तथा कार्यकारी अधिकारी यांना परिपत्रकानुसार योग्य ती कार्यवाही आणि अंमलबजावणी करण्याबाबत चे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.अहिल्यानगर महानगरपालिका तसेच जिल्हा पोलिस प्रशासनाने देखील शासन आदेशानुसार योग्य ती कार्यवाही आणि अंमलबजावणी करण्याबाबत करण्याच्या सूचना संबंधित विभागास केल्या आहेत.शहा यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक,पोलिस उपअधीक्षक,पोलिस निरीक्षक , महानगरपालिका आयुक्त,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी,पशुसंवर्धन विभाग, प्रभाग अधिकारी या सर्वांशी संपर्क करत शासन आदेश नुसार योग्य ती कार्यवाही आणि अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितांना सूचना कराव्यात अशी विनंती देखील केली आहे.तसेच महाराष्ट्र शासन आदेशाची संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी ईमेल मुख्यमंत्री कार्यालयास पाठवला आहे.कार्यालयाने पुढील कार्यवाही साठी संबंधित अधिकारी आणि विभागास पाठवला असल्याचे शहा यांनी यावेळी सांगितले.