बनावट नोटांची विक्री करुन बदल्यात ख-या नोटा घेवुन फसवणुक करणारी गँग गजाआड..स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-बनावट नोटा विक्री करुन त्याबदल्यात ख-या नोटा घेवुन फसवणुक करणारी टोळी तब्बल एक कोटीच्या बनावट नोटासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.दि.24 ऑगस्ट 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना माहिती मिळाली की,दौंड कडुन नगर शहराकडे एका पांढरे रंगाचे मारुती सुझुकी इरटीगा क्र. MH-12- SU.-2317, आणि सिलव्हर रंगाची मारुती सुझुकी स्वीफ्ट गाडीमध्ये काही इसम व एका मोटारसायकल वर दोन इसम असे त्यांच्याकडे असलेल्या भारतीय चलनाच्या बनावट नोटा विक्री करुन त्याबदल्यात ख-या नोटा घेवुन फसवणुक करणारी टोळी,व्यवहार करण्याकरीता येत आहे.

अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक कबाडी यांनी लागलीच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना खात्री करून कारवाई करण्यास सांगितले.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नगर दौंड रोडवरील कायनेटीक चौकापासुन दौंड रोडने सुमारे 200 मी.अंतरावरील हनुमान मंदिराचे जवळ सापळा रचुन दौंडकडुन येणारे पांढरे रंगाचे मारुती सुझुकी इरटीगा नंबर पाहिला असता तो क्र. MH-12- SU.-2317 मध्ये असलेले इंद्रजित बिबीशन पवार वय 29 रा.शांतीनगर,भोसरी,ता.हवेली, जि.पुणे,दिपक राजेंद्र भांडारकर वय 32 रा.शांतीनगर, भोसरी ता. हवेली,जि.पुणे,शरद सुरेश शिंदे वय 29 रा. वरंवडी,ता.संगमनेर जि.अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले व त्याच वेळी मोटार सायकल वरील दोन इसम व स्विप्टगाडी मधील 3 इसम पळुन गेले.पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपी व चारचाकी वाहनाची अंगझडती घेऊन त्यांचे ताब्यातुन एकुण 9,57,000/- रुपये किमतीचे भारतीय चलनाच्या हुबेहुब दिसनाऱ्या 500 रु. दराच्या 12 नोटा व त्याखाली भारतीय बच्चो का बैंक 500 रुपये असे छापलेले प्रत्येक बंडल मध्ये 100 कागदी नोटा असलेले 12 बंडल , तसेच 88 भारतीय बच्चो का बैंक, 500 रुपये असे छापलेले बंडल त्यातील प्रत्येक बंडल मध्ये 100 कागदी नोटा,तसेच 20 भारतीय बच्चो का बैंक 200 रुपये असे छापलेले बंडल त्यातील प्रत्येक बंडल मध्ये 100 कागदी नोटा, एक मारुती सुझुकी इरटिका गाडी, एक टीव्हीएस स्टार कंपनीची मोटार सायकल व 04 मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.ताब्यातील आरोपीची चौकशी केली असता, त्यांनी पळुन गेलेले इसम पैकी एकाचे नाव जितेंद्र ममता साठे रा. वासुदे,ता.पारनेर जि. अहिल्यानगर असे सांगितले व इतर 04 इसमांना ओळखत नसल्याबाबत माहिती दिली. तसेच त्यांची एक गॅग असुन ते नेहमी त्यांचे कब्जात बनावट नोटा बाळगुन ते खरे आहेत असे लोकांना भासवुन त्यांना बनावट नोटा देवुन आर्थिक व्यवहार करुन फसवणुक करत असतात.
तसेच त्यांचेकडे अधिक विचारपुस करता त्याने दोन दिवसापुर्वी कोपरगांव जि. अहिल्यानगर येथे सुमारे 7 लाख रुपये किमंतीच्या बनावट नोटा दिले असल्याचे सांगितले आहे. नमुद आरोपी विरूध्द कोतवाली पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 179 ,180,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.तरी अशा प्रकारे कोणाची फसवणुक झाली असले, तर त्यांनी संबधीत पोलीस स्टेशनला तक्रारी देण्याचे अहवान करण्यात येत आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी,सपोनि/ हरिष भोये,पोहेकॉ/सुनिल पवार, सुरेश माळी,दिपक घाटकर, हदय घोडके,पोना/भिमराज किसन खर्से,पोकॉ/आकाश काळे,अमोल कोतकर,बाळु खेडकर,मनोज साखरे,चालक सफौ/उमाकांत गावडे यांनी केलेली आहे.