अखेर ‘भाग्यलक्ष्मी’ चा मुख्य फरार आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात;पंढरपुरातून आवळल्या मूसक्या
अहिल्यानगर प्रतिनिधी:भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड मध्ये तब्बल २१ कोटी रुपयांच्या ठेवींचा आर्थिक घोटाळा करणारा भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट या वित्तीय संस्थेचा संस्थापक अध्यक्ष भारत पुंड याला काल (दि.१) डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिसांनी पंढरपुरात अटक केली आहे.
भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये अहिल्यानगरच्या ठेवीदारांनी तीस कोटी आणि छत्रपती संभाजीनगरच्या ठेवीदारांनी वीस कोटी अशा 50 कोटी रुपयांच्या ठेवी गुंतवल्या आहेत.या मल्टीस्टेटचा संस्थापक अध्यक्ष भारत पुंड याच्या विरुद्ध अहिल्यानगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गेली तीन ते चार महिने तो फरार होता.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण विभाग संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनी.माणिक चौधरी यांच्या सूचनेनुसार पोसई.जाधव,पोहेकॉ.नितीन उगलमुगले,राजू सुद्रिक,किशोर जाधव,सूरज देशमुख,पोहेकॉ.चौधरी,अहिल्यानगर दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ.राहुल गुंडू यांनी केली आहे.