Maharashtra247

मुकुंदनगर खुन प्रकरणातील आरोपी अवघ्या ८ तासातच जेरबंद भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई

 

अहिल्यानगर प्रतिनिधी:मुकुंदनगर खुन प्रकरणातील आरोपीस पुणे येथुन 8 तासात तपास करत भिंगार कॅम्प पोलीसांनी जेरबंद केले आहे.बातमीची हकीकत अशी की,दि.29 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 06/30 वा.चे सूमारास जिलानी मेडिकल,मुकुंदनगर या ठिकाणी यातील आरोपी शुमशुदीन निजामुदीन खान व जिशान रुस्तमअली खान असे गण्या मारत बसले होते.

त्यावेळी ते एकमेकांची चेष्टा मस्करी करत होते. आरोपी शुमशुदीन निजामुद्दीन खान यास केलेली चेष्टामस्करी सहन न झाल्याने त्याचा राग येऊन त्याने मेडिकलचे काऊंटरवरील कात्री हातात उचलून काऊंटरच्या आतमध्ये येऊन जिशान रुस्तमअली खान याचे पाठीत कात्रोने वार करुन त्यास गंभीर जखमी केले,गंभीर जखमी झाल्याने जिशान यास औषधोपषचार कामी साईदीप हॉस्पीटल,अहिल्यानगर येथे दाखल केले असता दि.30 नोव्हेंबर 2024 रोजी त्याचेवर औषधोपचार चालू असताना तो मयत झाला.

याबाबत नसीब अली रुस्तमअली खान यांचे फिर्यादीवरुन भिंगार कॅंम्प पोलीस स्टेशन येथे गुरं.7912024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्हा घडल्यानंतर आरोपी हा फरार झाला होता.सदर गुन्द्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असताना सहा. पोलीस निरिक्षक जगदीश मुलगीर यांना तात्रीक विश्लेषणाद्वारे माहीती समजली की,सदर आरोपी हा पुणे येथे पळून गेला आहे.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी तपास पथकातील अंमलदार यांना सुचना व मार्गदर्शन करुन सदर आरोपी ताब्यात घेणे कामी पूणे येथे तपास पथक रवाना होऊन त्यांनी सदर गुन्ह्मतील आरोपी नामे शुमशुद्दीन निजामुद्दीन खान रा.मुकुंदनगर यास पूणे येथुन शिताफिने गुन्हा घडल्यानंतर अवध्या 8 तासात ताब्यात घेऊन त्यास अटक केली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री.अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरिक्षक श्री.जगदीश मुलगीर यांच्या सूचनेनुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल दिपक शिंदे,संदिप घोडके,पोकॉ.समीर शेख,प्रमोद लहारे,दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ.राहूल गुंडू यांनी केली आहे.

You cannot copy content of this page