अहिल्यानगर प्रतिनिधी:- अहिल्यानगर शहराच्या कोतवाली पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यासह इतर कर्मचारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून शिवीगाळ केल्याची व प्रशासकीय अधिकारी,राजकीय नेत्यांना बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे.
या प्रकरणी भाऊसाहेब नारायण शिंदे (रा.चिचोंडी पाटील,ता.अहिल्यानगर) याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भाऊसाहेब शिंदेने कोतवाली पोलीस ठाण्यात फोन करून महिला कर्मचारी व एका पुरुष कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली तसेच पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी व विविध वरीष्ठ पोलिस अधिकारी,राजकीय नेत्यांची नावे घेऊन त्याने शिवीगाळ केली.
प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेत्यांना बॉम्बस्फोट करून उडवून देईल,अशी धमकीही त्याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.