Maharashtra247

घरफोडी करणारी टोळी जेरबंद ६ घरफोड्या उघड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

 

अहिल्यानगर प्रतिनिधी:-जामखेड तालुक्यामध्ये विविध ठिकाणी घरफोडी करणारी टोळी २ लाख ३० रू.किमतीच्या मुद्देमालासह ४ आरोपीना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ६ घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,यातील फिर्यादी श्री. काकासाहेब रामदास अडाले,रा.धोत्री, ता.जामखेड हे दि.०३ डिसेंबर २०२४ रोजी त्याचे कुटुंबियासह लग्नाकरीता बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरटयांनी त्यांचे घराचे दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरातील सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरून नेले.याबाबत जामखेड पो.स्टे.गुरनं 611/2024 भा.न्या.सं. 2023 चे कलम 331 (3), 305 (अ) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत सातत्याने घरफोडीचे गुन्हे होत असल्याने श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना ना उघड घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि/हेमंत थोरात व पोलीस अंमलदार बबन मखरे, हृदय घोडके,फुरकान शेख,संतोष खैरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे,ज्योती शिंदे,सारिका दरेकर व उमाकांत गावडे अशांचे पथक नेमुन घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणणेबाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.तपास पथक वरील गुन्हयांतील गेला माल व आरोपीचा तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेत असताना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की,सदरचा गुन्हा हा निंबाळकर आसाराम भोसले, रा.आष्टी,जि.बीड याने त्याचे साथीदारासह केलेला असून ते चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी गुगळे प्लॉटींग,जामखेड येथे येणार आहेत.पथकाने मिळालेल्या बातमीतील ठिकाणी जाऊन संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव निंबाळकर आसाराम भोसले,वय 36, रा.रूटी,ता.आष्टी, जि.बीड,आहिलाश्या उर्फ जाधव उर्फ झोळया जंगल्या भोसले, वय 50,रा.पांडेगव्हाण, ता.आष्टी,जि.बीड, कौशल्या अहिलाश्या भोसले,वय 35,रा.पांडेगव्हाण, ता.आष्टी, जि.बीड व महादेव सुखदेव भोसले, वय 55,रा.चिखली, ता.आष्टी, जि.बीड असे सांगीतले.

आरोपितांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता आरोपी महादेव सुखदेव जाधव त्याचे ताब्यातुन 70,000/- रू किं.10 ग्रॅम सोन्याचे नेकलेस, 15,000/- रू किं मोबाईल,आरोपी निंबाळकर आसाराम भोसले याचे ताब्यातुन 70,000/-रू.किं.10 ग्रॅम सोन्याचे बाजीगर व आरोपी आहिलाश्या जंगल्या भोसले याचे ताब्यातुन 75,000/- रू.किं.अर्धवट नंबर असलेली एक मोटार सायकल असा एकुण 2,30,000/- रू किं मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.तपास पथकाने वरील आरोपीतांना विश्वासात घेऊन,गुन्हयांबाबत विचारपुस केली असता आरोपीतांनी सदरचा गुन्हा हा रामेश्वर जंगल्या भोसले,रा.पांडेगव्हाण, ता.आष्टी,जि.बीड (फरार) याचे मदतीने केला असल्याची माहिती सांगीतली.तसेच गुन्हयातील चोरलेले सोने हे कौशल्या अहिलाश्या भोसले हिचे मदतीने महादेव सुखदेव जाधव यास विकण्यासाठी आलो होतो अशी माहिती सांगीतली आहे. 

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांनी त्यांचा साथीदार रामेश्वर जंगल्या भोसले यांचेसह जामखेड,कर्जत व खर्डा येथे घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे दिलेल्या माहितीवरून,जामखेड, कर्जत व खर्डा पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील घरफोडीचे खालीलप्रमाणे 06 गुन्हे उघडकिस आणले आहेत.अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1 जामखेड 611/2024 बीएनएस 331(3), 305 (अ)

2 जामखेड 509/2024 बीएनएस 331(3), 305 (अ)

3 जामखेड 575/2024 बीएनएस 331(3), 305 (अ)

4 जामखेड 456/2024 बीएनएस 331(3), 305 (अ)

5 कर्जत 674/2024 बीएनएस 331(3), 305 (अ)

6 खर्डा 187/2024 बीएनएस 331(3), 305 (अ) ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी जामखेड पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असुन पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन हे करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,श्री.विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page