हिवरगाव पावसा येथे महापरिनिर्वाण दिन साजरा;आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा हिवरगावकर यांना ८५ व्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन
संगमनेर प्रतिनिधी (नितीनचंद्र भालेराव):-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे कला सम्राज्ञी पवळा कला मंच आणि भिमशक्ती मित्र मंडळाच्या वतीने ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.तसेच तमाशा क्षेत्रात प्रथम प्रदार्पण करणा-या आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा भालेराव हिवरगावकर यांना ८५ व्या स्मृतीदिनानिमित्त संयुक्तरित्या अभिवादन करण्यात आले होते.हिवरगाव पावसा येथील बुध्दविहारात भगवान बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छ.शिवाजी महाराज,माता रमाई,नामचंद पवळा हिवरगावकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. बालसंस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांनी सामुहिक बुध्द वंदना घेऊन अभिवादन केले.
यावेळी जेष्ठ संपादक यादवराव पावसे मागदर्शन करताना म्हणाले भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य,समता,बंधुता, न्याय,विचार दिला,लोकशाही शासन प्रणालीमुळे देश प्रगतीपथावर आहे.भारतीय राज्य घटनेचे मुळे देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्राच्या निर्मितीत मोठे योगदान आहे.भगवान बुद्ध यांचे विचार देशाला संविधानातून दिले आहेत.भारतीय राज्यघटने मुळे देश एकसंघ आहे याचे श्रेय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना दिले जाते.तसेच नामचंद पवळा यांनी कलाक्षेत्रात केलेले कार्य अलौकिक आहे.
त्यांच्या स्मृती जतन करण्याचे कार्य कला सम्राज्ञी पवळा कलामंच मार्फत केले जात आहे. दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
नामचंद पवळा यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी हिवरगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने आक्रमक लढा दिला जाणार आहे. त्यांचे नात भाचे दिवंगत चांगदेव लहुजी भालेराव यांनी भव्य स्वरूपाच्या स्मारकाचा प्रस्ताव तयार केला आहे. सदर प्रस्ताव संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाकडे दाखल केला आहे. सदर प्रस्ताव 4 जानेवारी 2024 रोजी राज्य शासनाने ग्रामविकास विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी वर्ग केला आहे. मात्र हा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे दीर्घकाळापासून प्रलंबित असून, त्याला गती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बौध्दाचार्य गौतम भालेराव व भिम शाहीर मधुकर भालेराव यांनी भिम गिते गाऊन महामानवाला मानवंदना दिली.तर कार्यक्रमास भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव,रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष समता सैनिक बच्चन भालेराव, सोमनाथ दवंगे,विकास दारोळे,महेंद्र भालेराव,मिराबाई भालेराव, बाबासाहेब भालेराव,कलावती गायकवाड,शारदा भालेराव,संजय भालेराव,लहानू भालेराव सह बालसंस्कार केंद्रातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.