युवकांमध्ये एच.आय.व्ही.एड्स जनजागृती करणे काळाची गरज-संपूर्ण सुरक्षा केंद्र
अहील्यानगर:-जागतिक एड्स दिनानिमित्त विविध ठिकाणी एचआयव्ही एड्स जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातात.युवकांमध्ये एचआयव्ही एड्स जनजागृती व्हावी या हेतूने जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण विभाग,संपूर्ण सुरक्षा केंद्र अहिल्यानगर,सुरक्षा क्लिनिक यांनी लक्ष अकॅडमी अहिल्यानगर येथे युवा वर्गात एच.आय.व्ही / एड्स व गुप्तरोग या विषयी संवेदिकरण करण्यात आले.
या वेळी वाळू इदे सर,सागर फुलारी यांनी एचआयव्ही / एड्स यातील फरक, एच.आय.व्ही.ची लक्षणे,कारणे,उपायोजना, गुप्तरोग यातून होणारे आजार , राष्ट्रिय एड्स हेल्प लाईन 1097 एडस् कायदा 2017 या बाबत सविस्तर माहिती सांगण्यात आली. युवकांनी लग्ना आधी आपली एचआयव्ही ची स्थिती जाणून घेणे,अति जोखीम वर्तन कमी करून उद्याचे भविष्य नियोजन करणे. या बाबत युवकांना मार्गदर्शन करण्यात आले.
गुप्तरोग मार्ग, अति जोखीम वर्तन गट कोणते आहे या बाबत जनजागृती करण्यात आली. या वेळी 120 युवकांशी संवाद साधण्यात आला. श्री. वाळू इदे, सागर फुलारी, आदित्य कर्पे, लक्ष अकॅडमी प्रा. कवडे सर उपस्थित होते.