परभणीतील घटनेचा नगर शहरात आंबेडकरी समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करून निदर्शन
नगर (प्रतिनिधी):-परभणी शहरामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका अज्ञाताने मंगळवारी सायंकाळी तोडफोड करून विटंबना केल्यामुळे समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने निषेध नोंदवून मार्केटयार्ड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शन करण्यात आली.
यावेळी आंबेडकरी समाजाचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे,अजय साळवे,सुमेध गायकवाड,सुनील साळवे, सुनील शिंदे, विजयराव भांबळ, किरण दाभाडे, महेश भोसले, अमित काळे, संजय जगताप, दीपक लोंढे, अमर निर्भवणे, विजय गायकवाड, सागर ठोकळ, हरीश आल्हाट, संदीप वाकचौरे, दया गजभिये, नवीन भिंगारदिवे, लखन सरोदे, संतोष पाडळे, विशाल गायकवाड, विनोद भिंगारदिवे, विशाल भिंगारदिवे, कौशल गायकवाड, शोभा गाडे ,सागर पटेकर, संघराज गायकवाड, संजय भिंगारदिवे, सोनू पाटोळे, सुजित घंगाळे, ऋषिकेश पाडळे, अजय बडोदे, शांतवम साळवे, नितीन कसबेकर, समीर भिंगारदिवे, येसुदास वाघमारे, शांतवन साळवे, जुनेद शेख, प्रा.भिमराव पगारे, पप्पू पाटील, सतीश साळवे, दीपक सरोदे, अविनाश भोसले आदीसह आंबेडकर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे म्हणाले की, परभणी येथे घडलेल्या घटनेचा सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने व पक्ष संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला तसेच बांगलादेशातील बौद्ध भिक्कु यांच्यावरील हल्ल्याचे देखील निषेध करण्यात आले व जो परभणी येथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपीला तात्काळ अटक करून देशद्रोहचा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने महाराष्ट्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कायमस्वरूपी एक पोलीस नेमण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.