Maharashtra247

संविधानाची विटंबना करणाऱ्या जातीवादी समाजकंटकाला फासावर लटकवा बहुजन समाज पार्टीची मागणी 

 

अमरावती प्रतिनिधी:-परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालय जवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची जातीयवादी समाजकंटकाकडून तोडफोड करून विटंबना करण्यात आली.त्याचे पडसाद परभणी जिल्ह्यासह महाराष्ट्रभर उमटले आहे.

महाराष्ट्रात महापुरुषांच्या विटंबना होणे हे नवीन नसून परंतु विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना फासावर लटकावे किंवा त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजय गोंडाने यांच्या नेतृत्वाखाली रामभाऊ पाटील,अनंता लांजेवार,दीपक पाटील,रमेश नागदिवे,मेधा तायडे यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष अजय गोंडाने म्हणाले की,भारतीय संविधानाची तोडफोड म्हणजेच ही भारतीय संविधानाची एक प्रकारे केलेली निर्घृण हत्या होय यापूर्वी व चालू सरकारने यावर ठोस पाऊले न उचलल्याने समाजकंटक  हे मोकाट फिरत आहे.त्यामुळे या समाजकंटकावर लवकरात लवकर कारवाई करावी कारवाई न झाल्यास बहुजन समाज पार्टीच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

You cannot copy content of this page