वर्धा जिल्हा प्रतिनिधी(सागर झोरे):-सेलू येथील भगत ले आऊट येथील सत्यसाई,साई बाबा,गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा या कार्यकमाचे अवचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.दि.२७ जानेवारीला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून त्या निमित्त शुक्रवार २५ जानेवारीला दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे.त्याचप्रमाणे भजन व नारायण सेवा माहेर वृद्धाश्रम सेलू घोराड येथे वस्त्रदान याचे देखील आयोजन सायं.४ ते ५ या वेळेत करण्यात येणार आहे.तसेच दि.गुरुवार २६ जानेवारी च्या शुभ मुहूर्तावर भूमिपूजन (वास्तुपूजन ) सकाळी ९ ते १ या वेळेत होणार आहे.यातच वटवृक्ष विधिवत पूजन सायंकाळी ४ ते ७ या वेळेत होणार आहे.सायंकाळी भजन संध्येचे आयोजन सायंकाळी ७ ते ८ या वेळेत करण्यात येणार आहे.मुख्य कार्यक्रम शुक्रवार दि.२७ जानेवारीला मूर्ती प्रतिष्ठापणा सकाळी ६ ते १२ या वेळेत करण्यात येणार आहे.त्यानंतर सामूहिक भजन वर्धा जिल्हा सत्कार समारंभाचे आयोजन दुपारी २ वाजून ३० ते ३ वाजून ३० या वेळेत करण्यात येणार आहे.त्यानंतर मंगल आरती व विभूती प्रसाद वितरण करण्यात येणार आहे.त्यानंतर हवन पूजन सायंकाळी ४ ते ७ पर्यंत आयोजकांनी आयोजित केले आहे. त्यानंतर वृद्धाश्रमातील नारायनांना अन्न व आमंत्रित लोकांना महाप्रसादाचे आयोजन दुपारी 4 ते सायंकाळी ७ पर्यंत करण्यात आले आहे.महाप्रसादनेच या कार्यमाची सांगता करण्यात येणार आहे.तरीही सर्व भाविक भक्तांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती भाविक भक्तांना श्री सत्यसाई सेवा समिती व आयोजकांनी केली आहे.

