अहिल्यानगर प्रतिनिधी:-अहिल्यानगर महानगरपालिका चे कार्यक्षम आयुक्त यांनी नुकतेच फ्लेक्समुक्त अहिल्यानगर अभियान राबविण्याचा निर्णय घेतला हा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे.
परंतु धार्मिक कार्यक्रमा बाबत जर फ्लेक्स असतील तर त्यांना परवानगीची बंधने आणू नका असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा एका पत्रकानव्ये मागणी केली. आयुक्त साहेब यांचा निर्णय नगर शहराच्या सुशोभीकरणाचे दृष्टीने योग्यच आहे कारण नगर शहरा मध्ये असा कोणताही चौक नाही की ज्या चौकात फ्लेग्स लावलेले नाहीत,अनेक ठिकाणी फ्लेग्स अश्या अडचणीत लावलेले असतात की त्या मुळे लहान मोठे अपघातही घडलेले आगेत व सदर फ्लेग्स कोणी सामान्य नागरिक हालवण्याचा प्रयत्न केला तर त्याला मारहाण झाल्याचे उदाहरण आहे.
यामुळे या पुढे फ्लेग्स लावण्यासाठी महानगर पालिकेची परवानगी तर आवश्यक आहेच पण फ्लेग्स प्रिंटिंग करणाऱ्यांनी सुद्धा परवानगी असल्याशिवाय प्रिंटिंग करू नये म्हणजे फ्लेग्स लावण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही.आयुक्त साहेब यांनी जो निर्णय घेतला या मध्ये फ्लेग्स लावावयाचे असेल तर त्यांना परवानगी शुल्क आकारून ऑनलाईन व सुलभ पद्धतीने परवानगी दयावी त्यासाठी फ्लेग्स लावणाऱ्यांना हेलपाटे घालण्याची वेळ येऊ नये अशीही मागणी बोज्जा यांनी केली.
तसेच सदर फ्लेग्समुक्त अहिल्यानगर अभियान ही आयुक्त साहेब यांनी काटेकोर पाळावी या मध्ये कोणालाही सूट देऊ नये अगर कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये असेही आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केले आहे.