अहिल्यानगर (दि.७ प्रतिनिधि):-फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते तसेच गोर गरिबांच्या मदतीला कायम धाऊन येणारे जिल्हा न्यायालयातील ॲडव्होकेट संदीप दादासाहेब पाखरे यांना युवा महाराष्ट्र फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ नुकताच प्राप्त झाला आहे.
त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याने शहरात व जिल्हा न्यायालयात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.