क
श्रीरामपूर प्रतिनिधी:- श्रीरामपूर शहरामध्ये १० जानेवारी २०२५ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करण्याबरोबरच नांदेड येथील सोमनाथ सुर्यवंशी हत्या प्रकरणात पोलीस आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल व्हावा व बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात,भीमाभाऊ बागुल,रवींद्र शिरसाठ यांसह मोठ्या संख्येने बंधू-भगिनी उपस्थित होत्या.