संगमनेर प्रतिनिधी(दत्तात्रय घोलप):- संगमनेर तालुक्यातील निमोण गावचे सरपंच व माजी सैनिक संदीप देशमुख या ध्येयवेड्या तरुणांना निमोण ग्रामपंचायतच्या माध्मामातून, राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील तसेच संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांच्या सहकार्यातून आगळावेगळा देशहिताच्या निर्णय घेतला आहे. खरं तर आता निमोण गावची मान यामुळे देशात उंचावणार आहे.निमोण गावातून जाणाऱ्या लोणी-नांदूर शिंगोटे हायवेलगत गावात 151 फूट उंचीच्या हायमास्टवर 60X20 फुटांचा.राष्ट्रध्वज आपल्याला लवकरच फडकलेला दिसणार आहे.
काल शुक्रवार दि. 10 जानेवारी 2025 रोजी दुपारी भव्य 151 फूट हायमास्टची यशस्वीरित्या उभारणी करण्यात आलीय.151 फुटांचा हायमास्ट उभारणीचं काम पुणे येथील एका एजन्सीला देण्यात आले आहे. भव्य राष्ट्रध्वजाच्या परिसरामध्ये सौनिकांचां देखावा,पेव्हर ब्लॉक, यांसह अनेक गोष्टींचे सुशोभीकरण निमोण बाजारतळावर करण्यात येणार आहे.यासाठी अंदाजित रक्कम 35 ते 40 लाखांचा खर्च येणारं आहे.१५१ फूट उंचीवरील या राष्ट्रध्वजाचे लोकार्पण राज्याचे जलसंपदामंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील,अहील्यानगर दक्षिणचे माजी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील,संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय युवा आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लवकरच संपन्न होणार असल्याची माहिती निमोण गावचे लोकनियुक्त सरपंच तसेच माजी सैनिक संदीप भास्कर देशमुख यांनी दिली आहे.
लवकरच निमोण गाव आपल्याला देशाच्या एका वेगळ्या पटलावर बघायला मिळणार आहे. सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारणारी महाराष्ट्रातील निमोण हि पहिली ग्रामपंचायत असणार आहे,की ज्या ग्रामपंचायतने सर्वात प्रथम 151 फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभारत आहे.याची इतिहास नक्कीच नोंद घेतली जाईल यात शंका नाही.राष्ट्रध्वजाचे उभारणीमुळे गावाला एक वेगळी ओळख प्राप्त होणार असल्याचे सरपंच संदीप देशमुख यांनी पत्रकार दत्तात्रय घोलप यांना बोलताना सांगितले आहे.