वसई (दि.१२ प्रतिनिधी):-शिवसेना जळगाव,धुळे जिल्हा संपर्क संघटक तसेच डहाणू विधानसभा संपर्क संघटक संपर्कप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती उषाताई मराठे यांच्या वाढदिवसा निम्मित वसई कोळीवाडा आनंद आश्रम मध्ये वयस्कर आजींना त्यांच्या जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या.
यामध्ये त्यांना तेलाच्या बाटल्या,खाद्यपदार्थ अशा अनेक विविध उपयोगी वस्तू त्यांना शिवसेनेच्या व श्रीमती उषाताई मराठे यांच्या वाढदिवसा निम्मित वाटण्यात आल्या.उषा मराठे यांनी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारास एक संघ राहून शिवसेनेत तब्बल ३४ ते ३५ वर्ष म्हणजे आज तागायत काम केले.त्यांनी शाखा संघटक,विभाग संघटक, वसई शहर संघटक, वाहतूक समिती सदस्य, वसई विरार नालासोपारा महिला आघाडी संघटक, रेल्वे सुरक्षा समिती सदस्य,वसई भरोसा सेल सदस्य,वसई शांतता कमिटी सदस्य अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहे.
‘गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक’ असे उपक्रम त्यांनी शिवसेना पक्ष संघटनेसाठी राबवले आहेत.आशा मराठे यांनी वाढदिवसानिमित्त वसई कोळीवाडा आनंद आश्रममध्ये एक सामाजिक कार्य समजून वयस्कर आजींना त्यांच्या जीवनावश्यक वस्तू पुरविल्या त्यामुळे या आनंदाश्रमातील ४५ आजी यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले व त्या भारावून गेल्या. व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.