अहिल्यानगर (दि.१५ जानेवारी):-अमेरिका येथील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रान्सिस्को येथून नासा प्रायोजित रोबोटिक चंद्रमोहिमेचे प्रक्षेपण १५ जानेवारी बुधवारी भारतीय वेळेनुसार सकाळी ११.४० वाजता (६:११ वाजता जीएमटी) झाले. ज्यामध्ये LUNARC च्या लूनर कम्युनिटी आर्ट गॅलरीला चंद्राच्या पृष्ठभागावर नेण्यात आले.
‘लाइफशिपच्या’सहकार्याने सुरू झालेल्या LUNARC च्या ऐतिहासिक कला दालनामध्ये ४० हून अधिक देशांमधून आलेल्या हजारो सृजनशील कलाकृतींचा समावेश आहे,जो सर्वसमावेशकता आणि सर्जनशीलतेचा ऐतिहासिक पुरावा आहे. या दालनात अशा व्यक्तींनी सादर केलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन आहे.ज्यांना व्यक्त होण्यास व्यासपीठ आत्तापर्यंत कुठेही मिळाले नव्हते.पण आता मानवतेच्या पुढील मोठ्या झेपेतील प्रवर्तक म्हणून त्यांच्या कलाकृती साजऱ्या केल्या जात आहेत.हे केवळ कलेचे प्रदर्शन नसून लोकांना अवकाशासंबंधी चर्चेत स्वतःला समाविष्ट करण्याचे आणि भविष्यामध्ये आत्मविश्वासाने पाऊल टाकण्याचे आमंत्रण आहे.ही मोहीम अवकाश संशोधनाचा भाग होऊ न शकलेल्या लोकांना समाविष्ट करणारी एक प्रत्यक्ष चंद्रमोहिम आहे,जे ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे पाऊल आहे.असे LUNARC सह-संस्थापक टॉफर विल्किन्स म्हणाले.त्यांच्या दृष्टीकोन चंद्रावर पाठवून आम्ही सर्वांसाठी अवकाश ही कल्पना प्रत्यक्षात आणत आहोत.ज्यांनी योगदान दिले आहे आणि त्यांच्या सारख्या अनेकांना मानवतेच्या भविष्याचे निर्माण करण्याची प्रेरणा देत आहोत.अवकाश संशोधनातील एक महत्त्वाचा टप्पा
लूनर कम्युनिटी आर्ट गॅलरी हा LUNARC चंद्र विद्यापीठ (Lunar University) स्थापन करण्याच्या दूरदर्शी प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.जे दुसऱ्या ग्रहावर स्थायी शिक्षण संस्था उभारण्याचे पहिले पाऊल ठरेल. जागतिक सहयोगासाठी डिझाइन केलेले चंद्र विद्यापीठ विविध उपक्रम एकत्रित करेल,नावीन्याला चालना देईल आणि पृथ्वी तसेच अंतराळातील आव्हानांसाठी प्रेरणादायी उपाय सुचवेल.
लाइफशिपच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या मोहिमेमुळे LUNARC मिशनला पुढे चालना मिळाली आहे,ज्याचा उद्देश दुर्लक्षित आवाजांना सक्षम करणे आणि त्यांना अवकाश संशोधनाच्या कथेचा केंद्रबिंदू बनवणे आहे. जागतिक स्तरावरील स्वयंसेवी संस्थांसह सहकार्य करून, LUNARC ने सुनिश्चित केले आहे की चंद्रावरचा प्रवास मानवतेच्या विविधतेचे आणि सामूहिक सर्जनशीलतेचे प्रतिनिधित्व करतो.स्नेहालय संस्थेतील मुलांचा सहभाग:
स्नेहालयाला या ऐतिहासिक मोहिमेसाठी LUNARC सोबत सहभागी होताना अतिशय आनंद होत आहे.स्नेहालय संस्थेसाठी हा अभिमानाचा क्षण आहे कारण लूनर कम्युनिटी आर्ट गॅलरीच्या या उपक्रमात सहभागी होऊन सेवावास्तीत (झोपडपट्टीत) मुले, स्नेहालय इंग्लिश मिडीयम शाळेतील विद्यार्थी आणि आव्हानात्मक पार्श्वभूमीतून येणाऱ्या आमच्या मुलांच्या चित्रांना यामध्ये सहभागी होता आले. समाजातील शेवटच्या आणि वंचित घटकांचा आवाज आम्हाला या माध्यमातून थेट चंद्रावर पोहीचविता आला.
स्नेहालय संस्थेची सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, शिक्षणाला चालना देणे आणि दुर्लक्षित समुदायांना सक्षम करणे यासारखी मुल्ये LUNARC च्या सर्वांसाठी अवकाश या उद्दिष्टाशी संपूर्णपणे जुळतात.
स्नेहालयाच्या या मोहिमेतील सहभागाबद्दल अधिक माहितीसाठी,कृपया संपर्क साधा:
डॉ.प्रीती भोंबे स्नेहालय info @snehalaya.orgwww.snehalaya.org
आवाहन
या ऐतिहासिक प्रवासाचा भाग व्हा. लूनर युनिव्हर्सिटी जाहीरनाम्यावर आज स्वाक्षरी करा आणि अवकाश संशोधन मानवतेच्या विविधता, सर्जनशीलता आणि एकतेचे प्रतिबिंब कसे आहे, हे सुनिश्चित करण्यासाठी जागतिक चळवळीत सामील व्हा.
जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करण्यासाठी : https://www.lunarc.org/declaration
अधिक माहितीसाठी भेट द्या: www.lunarc.org
अनेक ग्रहांवर मानवता पोहोचविण्यासाठी एकत्र येऊया!